fbpx

धनगर समाजाची ज्यांनी फसवणूक केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे- अशोक चव्हाण

ashok chawan

आझाद मैदान- धनगर समाजाला ST मध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या ढोल गर्जना आंदोलनात सहभागी होऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ढोल वाजवून धनगर समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिला.

भाषणातील महत्वाचे मुद्दे-

  • धनगर समाजाची ज्यांनी फसवणूक केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
  • धनगर समाज आणि मराठा समाजाचे प्रश्न सारखेच आहेत त्यांना हि असच झुलवत ठेवलं आहे.
  • सरकारकडे भीक मागायला आता जायचं नाही, निर्णय घेण्याची वेळ आपली आली आहे.
  • धनगर आहे की धनगड हे महत्त्वाचं नाही तर समाज किती उपेक्षित आहे हे पाहायची वेळ आहे.
  • काही ना वाटतंय कि तुमच्याकडे आले की त्यांना काय वाटेल, पण आदिवासी आणि धनगर या दोघांना एकत्र घ्यायचं आहे.
  • प्रत्येकाचं आरक्षण शाबूत ठेऊन निर्णय घ्यायचा आहे
  • एसटी आरक्षणात तुमचं साडेतीन टक्के मिळवून तुम्हाला दिल हि तुमची मागणी काही चुकीची नाही
  • तुमच्या ढोलचा आवाज आमच्या कानापर्यंत आला आहे
  • ज्यांनी चार वर्षात काही केलं नाही त्यांना आता राम राम करा