“ज्यांना उद्योग नाही ते टीका करत असतात” –  अजित पवारांनी सुजय विखेंना फटकारलं

रत्नागिरी: भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेल्या टीकेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुजय विखेंना चांगलचं प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार यांनी पत्रकारांना विनंती केली म्हणाले, “ज्यांना उद्योग नाही त्यांनी आमच्यावर टीका करायची आणि आम्ही त्याला उत्तर द्यायचं. पुन्हा तुम्ही त्यांच्याकडे जायचं, त्याला तुमचं उत्तर काय असं विचारायचं. यातून तुम्ही काय साधणार आहात? आणि मी काय साधणार आहे? राज्यातील जनता काय साधणार आहे? याचाही विचार करा ना, असे अजित पवार मीडियाशी बोलताना म्हणाले.

अजित पवार रत्नागिरीच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी जिल्हानियोजनाच्या बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर मीडियाशी त्यांनी संवाद साधला. “यावेळी सुजय विखे पाटील यांच्या टीकेवरील प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सुजय विखेंना फटकारलं. ज्यांनी केलेल्या स्टेटमेंटला गांभीर्याने घेण्याची गरज आहे अशा स्टेटमेंटबद्दल आम्ही उत्तर देऊ. त्यांच्या स्टेमेंटला फार काही महत्त्व द्यायची गरज नाही,” अशा शब्दात अजित पवारांनी विखेंच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले.

महत्वाच्या बातम्या –

IPL 2022 : राशिद खानला मिळाली मोठी जबाबदारी..! पहिल्या सामन्यापूर्वी बनला गुजरात संघाचा…

यशवंत जाधवांच्या डायरी संदर्भात अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “बरेच जण आपल्या आईला…”

सुप्रिया सुळेंना सलग सातव्यांदा संसदरत्न; राष्ट्रवादीच्या ट्वीट करत शुभेच्छा

गोव्याच्या १४ व्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ!

IPL 2022 : आज नव्या संघांमध्ये पहिली लढत; वाचा काय सांगते वानखेडेची खेळपट्टी!