ज्यांची पात्रता नाही त्यांना सत्तेत पद ; एकनाथ खडसे

जळगाव : भाजप नेते एकनाथ खडसे यांची भाजपवरील नाराजी वाढतच आहे. पक्षाविरोधात वक्तव्ये करत नाराजी दर्शवणारे भाजपाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्ष टोला मारला आहे. ‘आपल्यात जशी निर्माण करण्याची धमक आहे, तसेच ती भस्मसात करण्याचीही आहे’ असे खडसे म्हणाले. तसेच आज लेवा पंचायतीच्या पाडळसे येथील राष्ट्रीय महाअधिवेशनात खडसे बोलत होते.

पाटीदार समाजाच्या मेळाव्यात त्यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत. लेवा पाटीदार-पटेल समाजात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. सरदार कल्लभभाई पटेल यांचा जन्म आपल्या देशात झाला हे भाग्य आहे. त्यांच्या कार्यामुळे ते लोहपुरुष ठरले क त्यांच्यामुळे देशाची प्रगती झाली. त्यांच्या पात्रतेमुळे ते तिथपर्यंत पोहचले. आजची राजकीय स्थिती मात्र नेमकी याच्या उलट आहे‘ज्यांची पात्रता नाही त्यांना सत्तेत पद मिळते आणि ज्यांची पात्रता आहे ते मात्र बाहेर आहेत’ असेही खडसे म्हणाले.

You might also like
Comments
Loading...