ज्यांचा कोरोना लसीवर विश्वास नाही त्यांनी पाकिस्तानात निघून जावे; भाजप नेत्याचा अजब सल्ला

corona

नवी दिल्ली : सिरममध्ये बनवण्यात येत असलेल्या कोविशिल्ड लसीचं देशभरात वितरण सुरू झालं आहे. काल लसींची वाहतूक करणारे ट्रक पोलिस बंदोबस्तात लोहगाव विमानतळावर रवाना झाले. तिथून हवाईमार्गे या लसींचं वितरण देशभरात सुरू झालं आहे.

एअर इंडिया, स्पाईसजेट आणि इंडिगो या तीन विमान कंपन्यांच्या नऊ विमानांमधून लसीचे साडे छप्पन लाख डोस पुण्यातून दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा बंगळुरू, लखनौ आणि चंडीगड या शहरात पोहोचवले जाणार आहेत.

एका बाजूला या लसीमुळे देशभरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे तर दुसऱ्या बाजूला कोरोना लसीवर मुस्लिम समाजाकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सरधानाचे भाजप आमदार संगीत सिंह सोम यांनी लसीकरणावर आक्षेप घेणाऱ्या लोकांना अजब सल्ला दिला आहे.

कोरोना लसीवर विश्वास नसेल, तर पाकिस्तानात निघून जावे, असं संगीत सिंह सोम यांनी म्हटलं आहे. सोम म्हणाले की,देशातील काही मुस्लिम बांधवांना कोरोना लसीवर विश्वास नाही. त्यांचा शास्त्रज्ञ, पोलीस आणि पंतप्रधानांवरही विश्वास नाही. त्यांना पाकिस्तान अधिक जवळचा वाटतो. त्यामुळं कोरोना लसीवर विश्वास नसेल, तर पाकिस्तानात निघून जावे. मात्र, शास्त्रज्ञांच्या मेहनतीवर शंका घेऊ नये असे त्यांनी म्हटले आहे.’

महत्वाच्या बातम्या