ज्यांना राज्यात एकहाती सत्ता आणता येत नाही, ते जाणते राजे कसे काय होऊ शकतात? – संभाजी ब्रिगेड

blank

टीम महाराष्ट्र देशा : ज्यांना राज्यात एक हाती सत्ता आणता येत नाही, ते जाणते राजे कसे काय होऊ शकतात? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी महाराष्ट्र देशा ला प्रतिक्रिया देताना उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय असा प्रश्न पडतो असं यावेळी उदयनराजे यांनी म्हटलं. पुस्तकाबद्दल ऐकून वाईट वाटलं. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे उदयनराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर देखील जोरदार घणाघात केला आहे. आज कोणालाही जाणता राजा उपाधी दिली जाते, कोणाला दिली गेली मला माहित माहित नाही. पण जाणता राजा फक्त एकच छ.शिवाजी महाराज. अस म्हणत उदयनराजे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर कोणालाही जाणते राजे म्हणून घेण्याचा अधिकार नाही, आणि जे त्यांना जाणते राजे म्हणत असतील ते शिवाजी महाराजच अपमान करत असल्याचे देखील उदयनराजे म्हणाले. उदयनराजे यांच्या या टीकेला उत्तर द्यायला गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड पुढे सरसावले आहेत.

‘होय शरद पवार हे जाणता राजा आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न…प्रश्नांची मालिका सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेतच,’ असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे भोसले यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया देताना संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी महाराष्ट्र देशाला प्रतिक्रिया देताना म्हटले, सध्या कोणीही ‘जाणता’ नाही, आणि कोणी ‘राजा’ पण नाही. जो लेखणीशी बेईमानी करेल तो गद्दार असतो म्हणून जयभगवान गोयल यांनाही शिंदे ‘देश का गद्दार’ म्हणून जाहीर केले पाहिजे अस म्हणाले.

तसेच वरिष्ठ नेत्यांसमोर हुजरेगिरी करायची म्हणून काही लोक त्यांची छत्रपतींशी तुलना करतात,त्यांची जाणता राजा म्हणून कौतुक करतं. हे चुकीच आहे. सध्या कोणीही ‘जाणता’ नाही आणि ‘राजा’ ही नाही.कारण आता लोकशाही आहे, आणि लोकशाहीत मतदार हा ‘राजा’ आहे. बाकी सगळे त्यांच्यासमोर निवडणूकीत नतमस्तक होतात. वादग्रस्त पुस्तकाचा विषय गंभीर असून जाणीवपूर्वक काही लोक विषयाचा गोंधळ निर्माण करत आहेत.

शिंदे म्हणाले, राज्यात एक हाती सत्ता आणता येत नाही, ते जाणते राजे कसे काय होऊ शकतात? हा संशोधनाचा विषय आहे. गोयल पुस्तकात म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची आणि नरेंद्र मोदी यांची शारीरिक समानता एक आहे. हा निव्वळ खोटारडेपणा आहे. छत्रपती शिवराय लोककल्याणकारी व धर्मनिरपेक्ष राजे म्हणून देशभर आणि जगभर प्रचलित आहेत.

जर, जय भगवान गोयल यांनी पुस्तक मागे घेऊन महाराष्ट्राची माफी मागीतली नाही, तर खोटी उपाधी देणाऱ्या चमच्यांना जोड्याने मारले पाहिजे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना फक्त  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत’च होऊ शकते असेही शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र देशाला प्रतिक्रिया देताना संतोष शिंदे  नक्की काय म्हणाले 

सध्या कोणीही ‘जाणता’ नाही, आणि कोणी ‘राजा’ पण नाही

जो लेखणीशी बेमानी करेल तो गद्दार असेल. म्हणून जय भगवान गोयल याला  ‘देश का गद्दार’ म्हणून जाहीर केले पाहिजे.नेत्यांसमोर हुजरेगिरी करायची म्हणून काहीजण त्यांची छत्रपतींशी तुलना करतात, कोणी जाणता राजा म्हणून कौतुक करतात. मात्र हे साफ चुकीच आहे. सध्या कोणीही ‘जाणता’ नाही आणि ‘राजा’ ही नाही.

कारण देशात आता लोकशाही आहे, आणि लोकशाहीत मतदार हा ‘राजा’ आहे. बाकी सगळे त्यांच्यासमोर निवडणूकीत नतमस्तक होतात. वादग्रस्त पुस्तकाचा विषय गंभीर असून जाणीवपूर्वक काही लोक विषयाचा गोंधळ निर्माण करत आहेत.

‘अहद तंजावर तहद पेशावर… अवघा मुलूख आपला…!’हाच शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा आलेख आहे. ज्यांना राज्यात एक हाती सत्ता आणता येत नाही, ते जाणते राजे कसे काय होऊ शकतात? हा संशोधनाचा विषय आहे. जय भगवान गोयल पुस्तकात म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांची आणि नरेंद्र मोदी यांच्यात शारीरिक समानता आहे. हा निव्वळ खोटारडेपणा आहे.

छत्रपती शिवराय लोककल्याणकारी व धर्मनिरपेक्ष राजे म्हणून देशभर आणि जगभर प्रचलित आहेत. जर, जय भगवान गोयल यांनी पुस्तक मागे घेऊन महाराष्ट्राची माफी मागीतली नाहीतर खोटी उपाधी देणाऱ्या चमच्यांना जोड्याने मारले पाहिजे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबतच होऊ शकते.