‘घरी कडी लावून बसलेल्यांना रिकामटेकडा म्हणतात’, भाजपचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला

‘घरी कडी लावून बसलेल्यांना रिकामटेकडा म्हणतात’, भाजपचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला

uddhav

मुंबई : पावसाळा तोंडावर आलेला असताना मुंबई महापालिकेकडून सध्या नाल्यांच्या सफाईचे ८० टक्के काम पूर्ण झालेले असल्याचे दावे करण्यात येत आहेत. पण प्रत्यक्षात छोट्या नाल्यांच्या सफाईचे काम ८ टक्केही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात संपूर्ण मुंबई पाण्याखाली जाण्याचा धोका वाढला आहे अशी टिका भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सत्ताधारी शिवसेनेवर केली होती.

याला मुंबईतील शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांनी प्रत्त्युत्तर देत भातखळकर यांच्यावर निशाणा साधलाय. ‘भातखळकरांनी अजिबात चिंता करू नये. सर्व कामे पूर्ण होतील. पालिका समर्थ आहे. जमल्यास तुम्ही आणि तुमच्यासारखे तुमच्यातलेच रिकामटेकडे यांनी श्रमदान करुन एक तरी छोटा नाला साफ करा. कोरोनाच्या काळात तेवढेच पुण्य खात्यावर जमा होईल.’ अशी टीका ट्विटरच्या माध्यमातून केलीये.

पण या टीकेनंतर आणि रिकामटेकडे म्हणल्यावर शांत बसतील ते भातखळकर कसले. त्यांनी थेट यशवंत जाधव यांच्या पक्षप्रमुखांवर हल्लाबोल करत पलटवार केलाय. ‘रिकामटेकडा घरी कडी लावून बसलेल्याना म्हणतात किंवा कोरोनाच्या काळात लोकं मरत असताना नाईटलाईफची काळजी करणाऱ्या टक्केवारीवाल्याना. पालिका समर्थच आहे, पण सत्ताधारी मात्र निक्कमे आहेत. दर पावसाळ्यात हे दिसतेच.जनतेसाठी नालेच काय आम्ही राजकारणातली घाणसुद्धा साफ करण्याचे काम करीतच आहोत.’ असे जाधवांना सुनावले.

दरम्यान, ‘आरेमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाची मनाई असतानासुद्धा ठाकरे सरकारने आरेमधील तब्बल 32,310 वर्ग फुटाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला. इतकेच नव्हे तर हा परिसर परि-संवेदनशील क्षेत्र असताना सुद्धा केवळ बिल्डरांच्यासोबत असलेल्या ‘आर्थिक’ संवादातून हा प्रकल्प करण्याचे ठाकरे सरकारने ठरविले आहे’, असा गंभीर आरोप भाजपचे मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :