राम मंदिर बांधणाऱ्यांनी रामाप्रमाणे होण्याची आवश्यकता- मोहन भागवत

mohan-bhagwat

भोपाळ: राम मंदिर बांधणा-यांनी रामाप्रमाणे होण्याची आवश्यकता, तेव्हाच कार्य शक्य आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. मोहन भागवत हे सध्या मध्य प्रदेशच्या दौ-यावर आहेत.  काल ते भोपाळमध्ये बोलत होते.

मोहन भागवत म्हणाले की, राम मंदिर बांधण्याची आताची वेळ अनुकूल असून राम मंदिर बांधणे आमची केवळ इच्छा नाही तर हा आमचा संकल्प आहे आणि हा संकल्प आम्ही पूर्णत्वास नेणार. यामुळे जे राम मंदिर बांधणार आहेत त्यांनी रामाप्रमाणे होण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच हे कार्य शक्य आहे, असंही ते म्हणाले.