ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका, उद्धव ठाकरेंनी खासदारांना झापलं 

udhav thakare

टीम महाराष्ट्र देशा : “ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका” असे स्पष्ट आणि खडे बोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांना सुनावले आहेत. ‘मातोश्री’वर बोलावून या खासदारांची कानउघाडणी केल्याची बातमी समोर येत आहे.

आता भाजप-शिवसेना युतीची शक्यता पूर्ण मावळल्याचे संकेत शिवसेना नेतृत्त्वाकडून मिळाले आहेत. युतीबाबत अनिश्चितता असल्याने शिवसेनेच्या खासदारांमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता पसरल्याचं म्हटलं जात आहे.

भाजपसोबत युती झाली नाही तर २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेची परिस्थिती केविलवाणी होऊ शकते, असं अनेक शिवसेना खासदारांचं मत आहे. यामुळे शिवसेना खासदारांमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थतता असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही, तर युती केली नाही तर आम्ही लढणार नाही, असं किमान पाच खासदारांनी सांगितल्याचंही बोललं जात आहे. ही बातमी प्रसारित झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांनी या अस्वस्थ खासदारांना ‘मातोश्री’ या निवासस्थानी बोलावून कानउघाडणी केली. भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका, असंही त्यांनी सुनावलं