राज्यराणी एक्सप्रेसचे ते दहा डब्बे अखेर अनलॉक, विविध रेल्वे हळूहळू पूर्वपदावर!

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. आता हळूहळू परिस्थिती सुधरत असल्याने विविध रेल्वे सुरु होत आहेत. कोरोनामुळे राज्य राणी एक्सप्रेस रेल्वेचे नांदेड ते मनमाड दरम्यान दहा रेल्वे कोच बंद ठेवून चालविण्यात येत होते. आता नांदेड विभागाने अटी शर्थींसह दहा रेल्वे कोच अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे कोचमधुन मराठवाड्याच्या प्रवाशांना प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र मनमाड ते मुंबईपर्यंतचा प्रवास या दहा रेल्वे कोचमधून करता येणार नाही.

मनमाड ते मुंबई धावणारी राज्य राणी एक्सप्रेस नांदेडपर्यंत वाढविण्यात आली. मनमाड, नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी दहा डब्बे राखीव ठेवण्यात आले होते. यामुळे नांदेड ते मुंबई धावणाऱ्या राज्य राणी एक्सप्रेसमधील दहा रेल्वे कोच नांदेड ते मनमाड दरम्यान बंद ठेवले होते. एकुण १७ डब्यांच्या या रेल्वेमधील दहा डब्बे कायम बंद असल्याने मराठवाड्यातील प्रवाशांना सात डब्यांची रेल्वे उपलब्ध झाली होती.

यातुन मराठवाड्यातील प्रवासी नाशिक, कल्याण, ठाणे आणि मुंबई पर्यंतचा प्रवास करत होते. मात्र आता नांदेड रेल्वे विभागाने अखेर दहा रेल्वे कोच अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनलॉकचे काही नियम रेल्वे विभागाने जाहीर केले आहे. दहा अनलॉक रेल्वे कोच मधुन मराठवाड्याच्या प्रवाशांना फक्त नांदेड ते मनमाड पर्यंतच प्रवास करता येणार आहे. ज्या प्रवाशांना मुंबईला जायचे आहे. त्यांना मनमाडला या रेल्वे कोच मधुन उतरावं लागणार आहे.

परभणी ते नांदेड पॅसेंजर (अनारक्षित) पूर्वी ०७६६५ या क्रमांकाने परभणी ते नांदेड दरम्यान धावणारी पॅसेंजर रेल्वेची १८ जुलै पासून नंबर बदलण्यात आला आहे. ही रेलवे आता ०७६७२ या नवीन क्रमांकानुसार परभणी ते नांदेड दरम्यान धावणार आहे. ही रेल्वे सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. ही रेल्वे अनारक्षित असेल. तसेच रेल्वे क्रमांक ०७६९२ तांडूर ते परभणी एक्स्प्रेस १७ जुलै पासून पूर्वी प्रमाणेच तांडूर ते परभणी दरम्यान धावेल. ही रेल्वे काही काळ सिकंदराबाद ते तांडूर आणि नांदेड ते परभणी दरम्यान अंशतः रद्द होती. सिकंदराबाद -नांदेड अशी धावत होती.

महत्त्वाच्या बातम्या

IMP