Uddhav Thackeray। मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे दोघे अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. पण त्यातच आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील शिंदे गटावर निशाणा साधलाय. मुंबईत काळाचौकीत शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रामाला उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, शिवसेनेशी गद्दारी करणारे हे बंडखोर नाहीत तर हरामखोर आहेत, नमकहराम आहेत, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले कि, ‘बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख होते. बाळासाहेब आम्हाला वडिलांप्रमाणे होते. त्यांच्या आशीर्वादानेच हे सरकार स्थापन झालं. अडीच वर्षापूर्वी झालं पाहिजे होतं त्याची आम्ही दुरुस्ती आता केली आहे. भाजपसोबत आमची युती होती. सारखं खंजीर खुपसल्यची भाषा केली जाते, जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकले त्यांनी खंजीरची भाषा करु नये. पाठीत खंजीर कुणी खुपसला हे मी योग्य वेळ आली की सांगेन, असा इशाराही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
शिवसेनेशी गद्दारी करणारे हे बंडखोर नाहीत तर हरामखोर आहेत, नमकहराम आहेत, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. तुमच्यात हिंमत असेल तर शिवसेना प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, तुमच्या हिंमतीवर मतं मिळवा, असे ते म्हणाले. प्रत्येकाला आईवडील प्यारे असतात. जे फुटून गेलेले आहेत, त्यातल्या सुदैवानं ज्यांचे आईवडील सोबत आहेत, त्यांनी त्यांना सोबत घेऊन सभा घ्याव्या आणि मतं मागावी. असा टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे. शिवसेनेसोबत ते माझे वडीलही चोरायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी बंडखोर आमदारांवर केली. अशा लोकांच्या हातात महाराष्ट्र, मुंबई आणि तुमचं आयुष्य तुम्ही देणार आहात का? असा सवालही त्यांनी मुंबईकरांना केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Khadse | या सरकारने संपूर्ण महाराष्ट्र वाऱ्यावर सोडलाय – एकनाथ खडसे
- Katrina Kaif | कतरिना कैफला जीवे मारण्याची धमकी; आरोपीविरुद्ध तक्रार दाखल
- IND vs WI : टीम इंडिया फुल जल्लोषात! वेस्टइंडीज विरुध्द विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंची धमाल, पाहा VIDEO!
- Jitendra Awhad : राजकारण हे फक्त सत्तेसाठी करायचं नसतं – जितेंद्र आव्हाड
- Shiv Sena : निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात उद्धव ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयात धाव
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<