Supreme Court- जात प्रमाणपत्र बोगस आढळल्यास नोकरीवरून मिळणार डच्चू !

तसंच त्याला शिक्षाही होऊ शकते

शिक्षणासाठी तसेच नोकरी मिळवताना बोगस जात प्रमाणपत्राचा वापर केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास संबंधीत व्यक्तीला नोकरी आणि पदवी दोन्ही गमवावी लागेल असा महत्त्वपूर्ण निकाल आज सुप्रीम कोर्टानं दिला. अशा व्यक्तीला शिक्षादेखील सुनावली जाऊ शकते असंही कोर्टानं स्पष्ट केलं. बोगस जात प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवणारा व्यक्ती कधीपासून नोकरीवर आहे हे महत्त्वाचे ठरणार नाही. एखादा व्यक्ती २० वर्षांपासून अधिक काळ नोकरीवर असला तरी बोगस जात प्रमाणपत्र आढळल्यास त्याची नोकरी जाईल तसंच त्याला शिक्षाही होऊ शकते असं कोर्टानं  आपल्या निर्णयात म्हटलं आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारनं बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाईल अशी घोषणा केली होती. केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी मार्चमध्ये लोकसभेत याविषयीची आकडेवारीदेखील सादर केली होती.

bagdure

गेल्या महिन्यात केंद्र सरकारने बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाईल अशी घोषणा केली होती. केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी मार्चमध्ये लोकसभेत याविषयीची आकडेवारीदेखील सादर केली होती.

You might also like
Comments
Loading...