काँग्रेसच्या ‘त्या’ नाराज नेत्यांनी भाजपा, आरपीआयमध्ये यावं : रामदास आठवले

athawale

मुंबई : राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस नेत्यांमध्ये असलेली धुसफूस काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून समोर आली आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे सोनिया गांधी यांच्या हाती देण्यात आली, तर येत्या काही महिन्यांत सोनिया गांधी हंगामी पदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार होता.

सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) रोजी कार्यसमितीच्या झालेल्या वादळी बैठकीमध्ये पुन्हा एकदा सोनिया गांधी यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. मात्र, यावेळी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या तब्बल २३ दिग्गज नेत्यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी, मिलिंद देवरा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

देवेंद्र फडणवीसांनी केले महा आघाडीवर गंभीर आरोप, कुठे होतोय ५०० कोटींचा ख़र्च तुम्हीच बघा

यावरून गेले अनेक दिवस काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस असून पुढची दिशा ठरवण्यासाठी हे नेते बैठक घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या नेत्यांना थेट भाजपा, रिपाई, एनडीएमध्ये येण्याचीच ऑफर देऊ केली आहे.

माफ कर मित्रा,आम्ही तुला वाचवू शकलो नाही- सत्यजित तांबे

यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.मंत्री रामदास आठवले यांनी, ” भाजपचे हस्तक म्हणून अपमानित केलेल्या काँग्रेस च्या नेत्यांनी अपमान सहन करीत न राहता काँग्रेसचा त्याग करावा. देशाच्या विकासासाठी गुलाम नबी आझाद ; कपिल सिब्बल;सारख्या काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप ; आरपीआय आणि एनडीए मध्ये यावे,” असे ट्विट केल्याने आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.

‘त्या’ कोव्हिड सेंटरचे उद्घाटन करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा राजीनामा हीच खरी श्रद्धांजली! : नितेश राणे

पत्राद्वारे नाराजी व्यक्त करणाऱ्या २३ काँग्रेस नेत्यांमध्ये कोण कोण?

काँग्रेस कार्यकारिणी सदस्य : गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकुल वासनिक, जितीन प्रसाद. माजी मुख्यमंत्री : पृथ्वीराज चव्हाण, राजिंदर कौर, वीरप्पा मोईली, भूपिंदरसिंह हुड्डा, राजिंदरकौर भट्टल. राज्यसभा खासदार : कपिल सिब्बल, अखिलेश प्रसाद सिंह, विवेक तनखा.लोकसभेचे खासदार : मनीष तिवारी, शशी थरूर.

माजी मंत्री: पी.जे.कुरियन, रेणुका चौधरी, मंत्र्यांचे सुपुत्र: संदीप दीक्षित, मिलिंद देवरा, अजय सिंह यांच्यासह माजी प्रदेशाध्यक्ष : राज बब्बर(उत्तर प्रदेश), अरविंदर सिंग लव्हली(दिल्ली), कौल सिंग ठाकूर (हिमाचल प्रदेश) , हरयाणा विधानसभेचे माजी अध्यक्ष कुलदीप शर्मा तसेच दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री आदींचा समावेश आहे.