‘राज्यघटनेशी बांधिल असलेल्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे’

BALASAHEB THORAT

मुंबई : राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वाशी बांधिल असलेल्यांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन लोकशाही आणि राज्यघटना टिकवण्यासाठी काँग्रेससोबत एकत्र यावे आणि यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केले आहे.

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशमधील गतवैभव गमावलेल्या जमीनदारासारखी झाली आहे, असे विधान केले होते. यावरच बाळासाहेब थोरात यांनी प्रतीउत्तर दिले आहे. सध्या राज्यघटनेतील मूल्यांना आणि ती जपणाऱ्यांना वाईट दिवस आले आहेत. समाजात तसेच देशात भेद निर्माण करणारे राजकारण सुरू असून याविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान शरद पवार यांच्या विधानावरून बऱ्याच प्रतिक्रिया उमटत गेल्या. कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी ‘काँग्रेसने ज्यांना जमीन राखायला दिली, त्यांनीच ती चोरली’ असे म्हणत पवारांवर नाराजी जाहीर केली होती. तर आता बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले आहे. ओबीसी आरक्षण प्रश्नावर आम्ही विरोधी पक्षांना सोबत घेऊन काम करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आम्ही चर्चा करू. असे त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या