थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले ‘युवा आमदार’दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?

टीम महाराष्ट्र देशा: बाळासाहेब थोरात यांच्या ‘अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या ‘मेधा-२०२०’ युवा संस्कृतीत महोत्सवात पहिल्यांदाच विधानसभेत एन्ट्री करणाऱ्या अनेक तरुण आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते.

त्यात रोहीत पवार,झिशान सिद्धीकी,आदिती तटकरे,आदित्य ठाकरे,धीरज देशमुख आणि ऋतुराज पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते.पण सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार हे दिसले नाही.त्याचबरोबर सर्वसामान्य घरातून येणारे भाजपचे आमदार राम सातपुते दिसले नाही. त्यामुळे सर्वसामान्य पार्श्वभूमी लाभलेले भुयार,सातपुते उपेक्षीत का? असा प्रश्न समाज माध्यमांवर उपस्थित करण्यात येत आहे.

Loading...

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शरद पवारांचे नातू रोहित पवार, सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव, डी.वाय.पाटील यांचा नातू ऋतुराज पाटील ही मंडळी पहिल्यांदाच विधानसभेत दाखल झाली आहे.पण यांना घराणेशाहीची पार्श्वभूमी आहे.

तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या देवेंद्र भुयार यांचीही चर्चा नेहमीच होते. भुयार यांनी मागील सरकारमधील कृषीमंत्र्यांचाच पराभव केला आहे. त्यामुळे ते तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत.तर राम सातपुते यांनी उत्तम जाणकारांचा पराभव केला होता.सर्वसामान्य उसतोड कामगाराचा मुलगा विधानसभेत जातो.पण याचे कुणाला कौतुक आहे का नाही?असा सवालही सध्या उपस्थित केला जातो आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण