बापरे… ‘या’ अभिनेत्री तब्बल ३६ हजारांचं वीज बिल, ट्विट करत व्यक्त केला संताप

mahavitarn

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत मार्च महिन्यांत लॉकडाऊन केले गेले आणि लोक आपआपल्या घरात कैद झालेत. आता लॉकडाऊन हळूहळू अनलॉक होतोय आणि याचदरम्यान लॉकडाउनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले असताना अवाच्या सवा दराने वीज बिल येत असल्याने महावितरण विरोधात राज्यभरात संताप आहे.

वीज बिलाचे आकडे पाहून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच शॉक्ड आहेत. बॉलिवूड अभिनेत्री तापसू पन्नूला तब्बल ३६ हजारांची वीज बिल आलं आहे. तापसीने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली असून संताप व्यक्त केला आहे. तापसी पन्नूने ट्विट करत म्हटलं आहे की, “लॉकडाउनचे तीन महिने आणि कोणती नवी उपकरणं मी वापरली आहेत किंवा नव्याने विकत आणली आहेत ज्यामुळे मला इतकं वीजबिल आलं आहे. नेमकं कोणत्या वीजेचं शुल्क आकारत आहात?,” यावेळी तापसीने अदानी वीज कंपनीला टॅगही केलं आहे.

तापसीने आपल्या ट्विटमध्ये आधीच्या महिन्यांच्या वीज बिलाचे फोटोही जोडले आहेत. एप्रिल महिन्यात तापसीला ४३९० तर मे महिन्यात ३८५० रुपये बिल आलं होतं. इतकंच नाही तर तापसीने आपण राहत नसलेल्या घरासाठीही भरमसाट वीज बिल आलं असल्याचं सांगितलं आहे. आपण फक्त स्वच्छतेसाठी आठवड्यातून एकदा तिथे जात असल्याचं तापसीने म्हटलं आहे. तापसीने यावेळी वीज बिलावर प्रश्चचिन्ह उपस्थित करताना कोणी माझ्या नकळत घराचा वापर करतंय का याची चिंता असल्याचं म्हटलं आहे.

राज्यातील तीनही वीज कंपन्या आणि वीज नियामक आयोगामध्ये समन्वय साधून घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोनाची तीन नवे लक्षण जगासमोर, ‘ही’ लक्षणे तुम्हाला असतील तर टेस्ट करून घ्या !

आता मुंबईत दोन किलोमीटर परिघाबाहेर जाणं निषिद्ध