हा देश माझा नाही- ए.आर.रेहमान

वेबटीम- मां तुजे सलाम ,वंदे मातरम यासारखे लोकप्रिय देशभक्ती गीत गाणारा सुप्रसिद्ध गायक ए.आर.रेहमान हा देशात घडलेल्या एका घटनेमुळे अत्यंत व्यतीत झाला आहे.गौरी लंकेश यांच्यासारख्या जेष्ठ पत्रकाराची हत्या जर माझ्या देशात होत असेल तर हा देश माझा नाही असे मत ए.आर.रेहमान व्यक्त केले आहे.

‘वन हार्टः द ए.आर. रहमान  या चित्रपटाच्या प्रीमियर प्रसंगी ते बोलत होते. “या घटनेबद्दल मी खूप दु: खी आहे. मला आशा आहे की अशी घटना भारतात होऊ नये. जर या घटना भारतात घडल्या तर हा माझा भारत नाही. मी आपला देश प्रगतीशील आणि शांत  असावा अशी माझी इच्छा आहे.