पुण्यात अवघ्या एक हजार रुपयांत तरुणाची विक्री

yogesh malkhare

पुणे- उत्तर प्रदेशातील एका तरुणाची पुण्यात अवघ्या एक हजार रुपयांत विक्री करण्यात आली असून त्याला भीक मागण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे. अनूप सिंह असं या तरुणाचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी असल्याच सांगितलं जात आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

अनुप पाच महिन्यांपूर्वी रोजगाराच्या शोधात तो मुंबईत आला होता त्यावेळी मानवी तस्करी करणाऱ्या गँगच्या जाळ्यात सापडला. या गँगने त्याचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पुण्यातील धुनू काळे नावाच्या महिलेला एक हजार रुपयांना विकलं. त्यानंतर रोज कमीत कमी १५०० रुपयांची कमाई करण्याची तंबी देऊन त्याला ट्रफिक सिग्नलवर भीक मागण्यासाठी सांगण्यात आलं.

मंगळवारी ट्रॅफिक सिग्नलवरून जात असताना सामाजिक कार्यकर्ते योगेश मलखारे यांना अनूप दिसला. त्याच्यासोबत धुनू काळेही होती. या दोघांकडे पाहून योगेशला संशय आला. त्यामुळे योगेश कारमधून उतरला आणि या दोघांच्या दिशेने चालू लागताच धुनूने तिथून पळ काढला. अनूपनेही या संधीचा फायदा घेत योगेशला सर्व हकीकत सांगितल्यानंतर हे भयाण वास्तव समोर आलं आहे .