यंदाही कोकण विभाग अव्वल, औरंगाबादचा निकाल जेमतेम

मुंबई: आज ३ जुलैरोजी शिक्षण विभागाने राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले असून संध्याकाळी ४ वाजल्यापासून संकेतस्थळावर हा निकाल बघता येणार आहे. या निकालानुसार विज्ञान शाखेचा निकाल ९९.४५ टक्के, कला शाखेचा निकाल ९९.८३ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ९९.९१ टक्के लागला आहे. याशिवाय, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ९८.८० टक्के इतका लागला आहे. त्यानुसार राज्याचा बारावीचा सरासरी निकाल ९९.६३ टक्के लागला आहे. मात्र, विभागनुसार राज्यात यंदाही कोकण विभागाने अव्वल स्थान पटकावले आहे. तर औरंगाबादचा निकाल जेमतेम लागला आहे.

कोकण विभागाचा निकाल ९९.८१ टक्के म्हणजेच सर्वाधिक लागला आहे. त्यानंतर मुबंई ९९.७९, पुणे ९९.७५, कोल्हापूर ९९.६७, लातूर ९९.६५, नागपूर ९९.६२, नाशिक ९९.६१, अमरावती ९९.३७ आणि औरंगाबाद ९९.३४ या विभागांचा क्रमांक लागतो. दरम्यान कोकण विभागात ९९.७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यापाठोपाठ ९९.५४ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत.

दरम्यान जवळपास सर्वच विद्यार्थी पास झाली आहेत. तर यंदाही कोकण विभागाचा सर्वाधिक टक्केवारी निकाल लागला आहे. तर औरंगाबादचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या