यंदा दहीहंडी गोविंदांच्या थरांविनाच!

मुंबई: ‘गोविंदा रे गोपाळा’ च्या जयघोषात उंचच उंच थर लावत हंडी फुटल्यानंतर होणारा जल्लोष, गोविंदांची आतुरतेने वाट बघणारी हंडी, गल्लोगल्लीत नटून फिरणारे बाळगोपाळ, हंडी फोडण्याची सुरु असलेली लगबग हे सर्व यंदा मात्र आपण या दहीहंडी उत्सवाला आपण मुकणार आहोत.  गेले ४ महिने कोरोनाने घातलेला कहर अजून देखील ओसरला नसून ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे, श्रावणातील सण, उत्सव आणि येणाऱ्या गणेशोत्सवाच्या उत्साहावर मात्र काही प्रमाणात मर्यादा आल्या आहेत.

तर, दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात यंदा शुकशुकाट पाहायला मिळणार असून आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. तर दुसरीकडे मनसेने देखील हा सण रद्द करून ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नौपाडा येथील त्यांच्या कार्यालयात गोकुळ अष्टमीचा जन्म उत्सव पूजा अर्चाकरून साजरा केला जाणार आहे.“सांस्कृतिक कार्यक्रमाचा खर्च यंदा कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसासाठी खाजगी गाड्या सोडण्यावर भर दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षी हंडी चांगल्या जल्लोशात साजरी करू”, असे मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी संगीतले आहे.

कोकणात गणेशोत्सवादरम्यान करणार २४ तास अखंडीत वीज पुरवठा: ऊर्जामंत्री नितीन राऊत

अनेक गोविंदा उत्सव मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, अनेक गोविंदा पथके हे मुंबईतील अनेक मानाच्या हंड्या फोडतात तर काही पुणे व अन्य शहरात देखील जातात. लाखोंचे मिळणारे बक्षीसं यातून अनेक गोविंदांना आर्थिक सहाय्य करत असते. मात्र, यावर्षी दहीहंडीच नसल्याने आर्थिक विवंचना सोडवण्याचा मोठा प्रश्न या गोविंदा पथकांतील हजारो गोविंदांना पडला आहे.

राज्यात एका दिवसात कोरोनामुक्तांचा आकडा १० हजारां पार, तर नवे रुग्ण इतके…

तसेच, शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही हा उत्सव मोठया श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात येतोय. मात्र यावेळी हा सोहळा भक्तांविना साजरा केला आहे. साईबाबांच्या मंदीरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासून चालत आली आहे. साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी अनेक भक्त साई दरबारी येत‌ असतात. मात्र कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होत आहे. काल रात्री साई मंदीरात 12 वाजता कृष्ण जन्म झाल्यानंतर शेजआरती पार पडली. तर आज दुपारी 12 वाजता मंदीरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे.

अनुसूचित जाती-जमातीचे पदोन्नतीचे आरक्षण कायम राहावे यासाठी पुण्यात निदर्शने