हा व्हॅलेंटाईन सिझन ठरणार ‘लकी’

टीम महाराष्ट्र देशा- फिल्ममेकर संजय जाधव यांनी गुरूवारी सोशल मीडियावरून आपल्या ‘लकी’ या नव्या चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेची घोषणा केली आहे. बी लाइव्ह प्रोडक्शन्स आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन निर्मित संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला ‘लकी’ सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

एम. एस. धोनी आणि फ्लाइंग जाट सारख्या हिट सिनेमाची निर्मिती करणारे बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे सुरज सिंग ‘लकी’ सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पाऊल ठेवत आहे. ह्यासंदर्भात बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे संचालक आणि लकी सिनेमाचे निर्माते सुरज सिंग म्हणतात,“आमच्या निर्मितीसंस्थेला मराठी चित्रपटनिर्मितीत उतरण्याची ब-याच काळापासून इच्छा होती. संजय जाधव हे मराठी सिनेसृष्टीतले आघाडीचे फिल्ममेकर आहेत. त्यांच्यासोबत आम्ही पहिला सिनेमा केल्याचा आम्हांला आनंद आहे. आता लवकरच 7 फेब्रुवारीला आमचा हा सिनेमा रिलीज होईल.

Loading...

दुनियादारी, तू हि रे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा अशा सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या संजय जाधव यांच्या लकी सिनेमातून साऊथ सिनेमा गाजवलेली अभिनेत्री दिप्ती सती डेब्यू करत आहे. अभय महाजन आणि दिप्ती सती सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसतील.

फिल्ममेकर संजय जाधव म्हणतात, व्हॅलेंटाईन्सच्या महिन्यात रिलीज होणारा आमचा रोमँटिक-कॉमेडी सिनेमा तरूणाईला खूप आवडेल, असा आमचा विश्वास आहे. तुमच्या संपूर्ण कुटूंबासोबत तुम्ही हा सिनेमा पाहू शकाल आणि तुमचं दोन तास भरपूर मनोरंजन होईल, ह्याची मला शाश्वती आहे.”

‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'