असं असेल मुंबई ईंडीयंसच्या सामन्यांचं वेळापत्रक

असं असेल मुंबई ईंडीयंसच्या आमन्यांचं वेळापत्रक

मुंबई:- इंडियन्सने गेल्यावर्षी आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे यावर्षी त्यांची कामगिरी कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यामुळे यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे सामने कोणत्या संघाबरोबर कधी होणार आहेत, ते पाहा,गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघ यावेळी सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सशी दोन हात करणार आहे. हा सामना चांगलाच रंगतदार होऊ शकतो. पण यावर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ कोणत्या संघाबरोबर कधी खेळणार आहे, पाहा खास मुंबईच्या संघाचे वेळापत्रक. मुंबई इंडियन्सचे या आपीएलमध्ये असतील असे सामने…

19 सप्टेंबर , शनिवार – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
23 सप्टेंबर, बुधवार – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
28 सप्टेंबर, सोमवार – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई

यावर्षी आयपीएलचा सलामीचा सामना मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईचा सामना २३ सप्टेंबरला कोलकाता नाइट रायडर्स संघाबरोबर असेल. मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबरोबर २८ सप्टेंबरला रंगणार आहे.

1 ऑक्टोबर, गुरुवार – किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
4 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3.30 वाजल्यापासून, शारजा
6 ऑक्टोबर, मंगळवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
11 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी

मुंबई इंडियन्सचा या मोसमातील चौथा सामना किंग्स इलेव्हन पंजाबरोबर होणार आहे. त्यानंतर मुंबईची गाठ पडेल ती सनरायझर्स हैदराबाद या संघाबरोबर, हा सामना ४ ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर मुंबईचा सहावा सामना राजस्थान रॉयल्सबरोबर ६ ऑक्टोबरला होणार आहे. मुंबईच्या या हंगामातील सातवा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाबरोबर ११ ऑक्टोबरला होणार आहे.

16 ऑक्टोबर, शुक्रवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
18 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
23 ऑक्टोबर, शुक्रवार – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजा
25 ऑक्टोबर, रविवार – राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी

मुंबई इंडियन्स आपला आठवा सामना कोलकाता नाइट रायडर्सबरोबर १६ ऑक्टोबरला खेळणार आहे. या मोसमातील मुंबईचा नववा सामना किंग्स इलेव्हन पंजाबबरोबर १८ ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. मुंबईचा संघ आपाल दहावा सामना चेन्नई सुपर किंग्सबरोबर २३ ऑक्टोबरला खेळणार आहे. त्यानंतर मुंबईचा ११वा सामना राजस्थान रॉयल्सबरोबर २५ ऑक्टोबरला होणार आहे.

28 ऑक्टोबर, बुधवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
31 ऑक्टोबर, शनिवार – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
3 नोव्हेंबर, मंगळवार – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजा

या हंगामात मुंबईचा १२वा सामना ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबरोबर होणार आहे. मुंबईचा संघ आपला १३वा सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर खेळणार आहे. मुंबईचा संघ या मोसमातील आपला अखेरचा सामना ३ नोव्हेंबरला सनरायझर्स हैदराबाद संघाबरोबर खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

‘गुड बाय नागपूर’ – तुकाराम मुंढे झाले भावुक; म्हणाले…

बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करत  कंगनाचा पुन्हा शिवसेनेवर  निशाणा

बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करत  कंगनाचा पुन्हा शिवसेनेवर  निशाणा