‘वर्षपूर्तीवर अशी मुलाखत पहिल्यांदा असेल की ज्यात मुख्यमंत्री सरकारच कामच सांगत नाही’

tahkare

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीदिनी ‘सामना’ला मुलाखत दिली. सरकारने एक वर्ष पूर्ण केले. दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले, सध्या फक्त हात धुतोय; जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन. काहींना डोक्याचे विकार झालेत. त्यांच्यावर उपचार करावे लागतील. मराठी माणसाला गाडून त्यावर कुणाला नाचता येणार नाही! सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या काळात पडलेत! असा दणकाच त्यांनी सुरुवातीला दिला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रदीर्घ मुलाखतीत सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली. ‘ईडी’ वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा. मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणाऱयांनो, तुम्हालाही कुटुंब, मुलंबाळं आहेत हे विसरू नका; पण आमच्यावर संस्कार आहेत म्हणून संयम ठेवल्याचा इशाराही त्यांनी दिला.

मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही. एक संस्पृती आहे. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्पृती आहे आणि तुम्ही कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱयांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो.

तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू. असा थेट इशारा ठाकरेंनी मुलाखतीतून दिला.

यावरच भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरेंच्या मुलाखतीवर ट्विट करून सरकारला चंगलेच सुनावले आहे. म्हणाले, ‘सरकारच्या वर्षपूर्तीवर अशी मुलाखत पहिल्यांदा असेल की ज्यात मुख्यमंत्री सरकारच कामच सांगत नाही आणि विरोधकांना धमक्या आणि गाडी चालवल्याच कौतुक करत असतात. अर्थात सरकारच काम सांगणार काय हा प्रश्नच आहे म्हणा.’

महत्वाच्या बातम्या