दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देखील लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे.
एनआयए कोर्टासमोर वाझेचे हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील खंडणी मागण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे. SBUT वरील चौकशी थांबवण्यासाठी व बृहन्मुंबई महापालिकेच्या काही ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्यास सांगितल्याचे सचिन वाझे याने आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
हे पत्र काल माध्यमांमधून समोर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत आणखी मोठी वाढ झाली आहे. भाजप नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला असून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. ‘या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहेत. वाझेंना पुन्हा सेवेत घेतल्या पासून या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली आहे. पोलिसच बॉम्ब ठेवतायत हे जगातील पहिलच उदाहरण असेल, असं म्हणत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनीच त्यांना हे कृत्य करण्याची टीका देखील प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- कोरोनामुक्त झाल्यानंतर अभिनेत्री प्रिया बापटची पहिली पोस्ट, म्हणाली…
- मविआ मंत्र्यांचा केंद्र सरकारविरोधात टाहो; मात्र पवार म्हणाले, केंद्र राज्याला सहकार्य करतंय
- दारूबंदीसाठी महिलांनी ‘या’ ठिकाणी कसली कंबर
- संजय राऊत विरोधात केंद्रीय महिला आयोगाला पत्र पाठवणार-चंद्रकांत पाटील
- निलेश राणे यांच्या सुचनेनंतर लांजा कोविड सेंटर सुरु करण्याला आला वेग