भीमजयंती १२७ : असे असतील उद्या पुण्यातील वाहतुकीत बदल

पुणे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त पुण्यात ठिकठिकाणी अभिवादनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता,वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार बदल केला जाणार आहे.नागरिकांनी वाहतुकीतील बदलाची नोंद घेऊ पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे .

असे असतील बदल-

पुणे रेल्वे स्थानक परिसरात बोल्हाई चौक ते पुणे रेल्वे स्थानक, बोल्हाई चौक ते साधू वासवानी चौक, जीपीओ जंक्शनकडून बोल्हाई चौक, चर्च रस्ता, अलंकार टॉकीजकडून जहांगीर हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता, दोराबजी चौकातून अरोरा टॉवरकडे जाणारा रस्ता सर्व वाहनांना बंद असेल.विमानतळ आणि टिंगरेनगर भागातून येणाऱ्या वाहन चालकांनी प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळील चौकातून उजवीकडे वळून येरवडा कारागृहासमोरून इच्छित स्थळी जावे.

बोपखेल, दिघी, भोसरी, आळंदीकडे जाणाऱ्या वाहनांनी शांतीनगर चौकातून डावीकडे वळून कच्च्या रस्त्याने कळस फाट्याकडे जावे. हॉटेल ‘ग्रॅण्ड’कडून अरोरा टॉवर, महात्मा गांधी रस्त्यावरील नाझ चौकातून अरोरा टॉवर, तीन तोफ चौक व सिल्व्हर ज्युबिली मोटर्सकडून अरोरा टॉवर हे सर्व रस्ते देखील बंद असणार आहेत.

पिंपरीतील पुलावरून शगून चौकाकडे जाणारी वाहतूक बंद असणार आहे. ही वाहतूक भाटनगरमार्गे चिंचवडला वळविली जाणार आहे. नेहरूनगरकडून पिंपरी चौकाकडे येणारी वाहतूक एच. ए. मैदानापर्यंतच चालणार आहे. ही वाहतूक यशवंत चौक, रससंग चौकाकडे वळवली जाईल.

अहिल्यादेवी चौक ते पिंपरी पूल हा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, दोराबजी चौक येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी आरटीओ, एसएसपीएमएस मैदान, शाहीर अमर शेख चौक ते कुंâभार वेस, गाडगीळ पुतळा, मालधक्का चौक ते बोल्हाई चौक, पुणे रेल्वे स्थानक, साधू वासवानी चौक येथे वाहने पार्किंग करण्याची सोय उपलब्ध असणार आहे.

You might also like
Comments
Loading...