fbpx

जयपूरमधील कालच्या सामन्यातील ‘टर्निंग पॉइंट’ बनला वादाचा मुद्दा

टीम महाराष्ट्र देशा : राजस्थान रॉयल्सला सोमवारी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून हातचा सामना गमवावा लागला. बटलर धडाकेबाज फलंदाजी करत होता. पण त्याला पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने ज्याप्रकारे आऊट केले, तो या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.

अश्विनने चेंडू टाकण्यापूर्वीच बटलरने क्रीझ सोडले होते. हे अश्विनच्या लक्षात आले आणि त्याने चेंडू न टाकता बटलरला रनआऊट केले. यावेळी बटलर आणि अश्विन यांच्यामध्ये वाद झाला. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हे प्रकरण सुपूर्द केले. तिसऱ्या पंचांनी यावेळी बटलर बाद झाल्याचा निर्णय दिला आणि त्यानंतर सामना पंजाबच्या बाजूने फिरला.

जयपूर येथे झालेल्या  राजस्थान वि. पंजाब या आयपीएल च्या चौथ्या सामन्यात पंजाबच्या संघाने पहिले फलंदाजी करत राजस्थान समोर १८४ धावांचे लक्ष्य उभे  केले. राजस्थानने हे आव्हान स्वीकारत  आक्रमक फलंदाजी केली. राजस्थान चा स्कोर १२.४ ओव्हर नंतर १ बाद १०८ धावा असा होता. ही ओव्हर आर आश्विन टाकत होता आणि स्ट्राईक वर संजू सॅमसन फलंदाजी करत होता. मात्र आश्विन ने नॉनस्ट्राइकिंग एंडला असणाऱ्या बटलरला रनआऊट केले.

बटलर क्रीज च्या बाहेर उभा होता आणि आर आश्विनने बॉल न टाकता सरळ स्टंपला लावत बटलरच्या विकेटची अपील केली. थर्ड अंपायर कडे निर्णय गेल्यानंतर अंपायरने बटलर आऊट असा निर्णय दिला. मात्र आता या प्रसंगा नंतर क्रिकेट विश्वातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही म्हणत आहेत की , आश्विन ने खेळ भावना दाखवली नाही. आश्विन ने बटलर ला वार्निंग द्यायला हवी होती. तर काही म्हणत आहेत की, आश्विन ने नियमात राहून योग्य केले आहे.