नरेंद्र मोदींचा हा दौरा म्हणजे ‘शेवटच्या षटकात होणारी महेंद्र सिंह धोनीची एन्ट्रीच’

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेस मध्ये चांगलाच घासून सामना पाहायला मिळत आहे. कॉंग्रेस ची मदार राहुल गांधी तर भाजपची सगलि९ मदार पंतप्रधान राहुल गांधी यांच्यावर आहे. यातच कर्नाटकात सत्तेत असणाऱ्या कॉंग्रेसचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही या आठवड्यात प्रचारासाठी उतरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा म्हणजे ‘शेवटच्या षटकात होणारी महेंद्र सिंह धोनीची एन्ट्रीच’ असल्याचे भाजपचे प्रवक्ते एस.प्रकाश यांनी म्हटले आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

महेंद्र सिंह धोनी शेवटच्या काही षटकांमध्ये मैदानात उतरतो आणि दमदार फलंदाजीने सामना जिंकतो. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींचा दौराही बदल घडवून आणेल. मोदींच्या उपस्थितीमुळेच प्रचारात फार मोठा बदल होईल. त्यांच्या प्रभावामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराला मोठी शक्ती मिळेल, असे एस.प्रकाश यांनी सांगितले आहे.

मंगळवार पासून पंतप्रधान मोदी कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. मोदी १,३,५,७ आणि ८ मे या ५ दिवसांच्या दौऱ्यात १५ प्रचार सभा आणि रॅलीजमध्ये सहभागी होणार आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

Shivjal