fbpx

देशात पुन्हा मोदी सरकार आले तर ‘या’ गावातील मुस्लिमांना सोडावंं लागणार गाव

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास आता काही तासच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार आहे. मात्र रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार उत्तरप्रदेश मध्ये जर भाजप पुन्हा जिंकल आणि देशात सत्तेवर मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून आले तर आम्हाला गाव सोडून जावे लागेल अशी भीती बुलंदशहरमधल्या नयाबांस गावातील मुस्लिमांनानी व्यक्त केली आहे.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, बुलंदशहरमधील मोदी आणि योगींनी सत्तेतआल्यापासून सर्वच परिस्थिती बिघडवून टाकली आहे. कारण नयाबांस गावात राहणाऱ्या मुस्लिमांच्या मते, गावात हिंदू-मुस्लिम एकमेकांशी बोलत देखील नाहीत. पहिल्यांदा अशी परिस्थिती नव्हती. मुस्लिम मुलंही हिंदूंच्या मुलांशी खेळायचे. परंतु आता मुस्लिम घाबरलेले असून, त्यांच्यामते 2 वर्षांत दोन्ही समाजांत मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाली आहे. त्यामुळे देशात पुन्हा मोदी सरकार आले तर आम्हाला आमचं गाव सोडव लागेल अशी भीती रॉयटर्सशी बोलताना मुस्लीम समाजाने व्यक्त केली आहे.

दरम्यान गेल्या वर्षी बुलंदशहरमधल्या याच भागात काही हिंदूंनी तक्रारी केल्या होत्या की, त्यांनी मुस्लिमांना गायीला कापताना पाहिलं होतं. त्यानंतर जमावानं एका पोलीस अधिकाऱ्यांचीही हत्या केली होती. 4 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या नयाबांस गावात जवळपास 400 मुस्लिम राहतात. परंतु 5 महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसेच्या छायेतून गाव अद्याप बाहेर आलेलं नाही.