पक्षनिष्ठा सोडून या दोन ‘दिग्गज’ भाजपच्या नेत्यांनी केली जावयाला मदत

भाजप

बापू गायकवाड : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील चारही टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले आहे. आणि आता जनतेला प्रतीक्षा आहे ती २३ मे ला जाहीर होणाऱ्या निकालाची. ही निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिली. भारतात जरी लोकशाही असली तरी घराणेशाहीचे वर्चस्व असलेले पाहायला मिळाले आहे. कारण एकाच कुटुंबातील अनेक नातेवाईक या निवडणुकीत उतरलेले पाहायला मिळालं आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे जागावाटप जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून संग्राम जगताप यांना उमेदवारी मिळाली तर भाजपने पक्षांतर केलेल्या सुजय विखे यांचावर विश्वास दाखवला. अहमदनगरमधील भाजपचे नेते शिवाजी कर्डिले यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचे नातेसंबंध आहेत. जगताप हे कर्डिले यांचे जावई आहेत.

नगरमध्ये शिवाजी कर्डिले नेमकी कोणाला मदत करणार याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होती. परंतु वारंवार शिवाजी कर्डिले यांच्याकडून आपण पक्षनिष्ठा राखत भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनाच मदत करणर असल्याच जाहीर करणय आलं होतं. शिवाजी कर्डिले यांची अहमदनगरच्या राजकारणात ‘किंगमेकर’ अशी ख्याती आह्रे, त्यामुळे अंतिम टप्प्यात शिवाजी कर्डिले यांनी पक्षनिष्ठा बाजूला ठेवत जावई संग्राम जगताप यांना मदत केल्याची कुजबुज अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात सुरु आहे.

तर दुसरीकडे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात नगर सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. शिवसेनेकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळाली. तर शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. त्यामुळे शिवसेनचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची डोकेदुखी वाढली आहे. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.

rawasaheb danve

रावसाहेब दानवे यांनीही पक्षनिष्ठा बाजूला ठेवून नातेसंबंध जपत जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली होती. आणि आता चंद्रकांत खैरे यांनी युतीधर्म न पाळता जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत केल्याचा आरोप केला आहे. तसेच खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत दानवेंची तक्रार देखील केली आहे. त्यामुळे भाजपने युतीधर्म न पाळल्याने शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.

अहमदनगर आणि औरंगाबादमधील ही राजकीय परिस्थिती पाहता नातेसंबंध आणि राजकारण हे दोन्ही मुद्दे वेगळे आहेत असं स्पष्ट होत आहे, तर नातेसंबंध हे राजकारणापेक्षा श्रेष्ठ असल्याचंही प्रतीत होत आहे. या दोनही ठिकाणी ‘पक्षनिष्ठा’ आणि ‘निष्ठावंत नेता’ हे शब्द निष्फळ ठरले आहेत.