टीम महाराष्ट्र देशा: टी 20 विश्वचषक (T20 World Cup) मध्ये भारतीय संघ (Team India) चा प्रवास संपल्यानंतर क्रिकेटच्या चाहत्यांच्या नजरा आता पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल (IPL 2023) कडे लागले आहेत. भारतीय संघ विश्वचषकामधून बाहेर पडल्यानंतर प्रेक्षक आता आयपीएलकडे वळले आहे. तर, आयपीएल 2023 (IPL 2023) साठी बीसीसीआय (BCCI) ने सर्व फ्रेंचायझिंना 15 नोव्हेंबर पर्यंत आपले रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व फ्रेंचाईजींनी आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शनचे नियोजन सुरू केले आहे. क्रिकबज वरून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व संघांचे याद्या तयार झालेल्या असून त्यांची अंतिम पुष्टी होणे बाकी आहे. त्याचबरोबर अनेक फ्रॅंचाईजी आपल्या संघाचे कॅप्टन (Captain) बदलू शकता अशी देखील माहिती बाहेर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या अनेक फ्रेंचाईजी केवळ त्यांच्या खेळाडूच नाही तर कर्णधार देखील बदलणार आहेत. याची सुरुवात पंजाब किंग (Panjab Kings) या संघाने केली होती. पंजाब किंग्स या फ्रॅंचाईजीने मयंक अग्रवालच्या जागी शिखर धवनला कर्णधार म्हणून निवडले आहे.
IPL 2023 मध्ये हैदराबाद सुद्धा बदलू शकते आपल्या कर्णधार
क्रिकबज वरून मिळालेल्या माहितीनुसार, सनरायझर्स हैदराबाद ही फ्रॅंचाईजी देखील आपला कर्णधार बदलू शकते. सनरायझर्स हैदराबाद या संघाचा न्यूझीलंडचा खेळाडू केन विलियम्सन कर्णधार होता. तर हैदराबाद के विलियम्सनला सोडण्याचा विचार करत आहे, अशी माहिती समोर आली आहे. पण सनरायझर्सने अद्यापही याबद्दल कुठली अधिकृत माहिती दिली नाही. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली संघाला गेल्या सीझनमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ही फ्रॅंचाईजी आपला कर्णधार बदलण्याच्या विचारात आहे.
दरम्यान, अजिंक्य राहणे, शिवम मावी आणि ऐरोन फ्रिंच यांची कोलकत्ता नाईट रायडर्स पुनर्विक्री करू शकते. त्याचबरोबर यावर्षी आयपीएल मधील रवींद्र जडेजा हा सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. त्याचबरोबर गेल्या सीझनमध्ये जडेजाचे चेन्नई सुपर किंग सोबत थोडेसे मतभेद झाले होते. अशा परिस्थितीत जडेजा यावर्षी चेन्नई सुपर किंग्सचा भाग असेल की नाही याबद्दल अजूनही कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
महत्वाच्या बातम्या
- OnePlus Mobile Launch | लवकरच लाँच होणार OnePlus चा ‘हा’ मोबाईल
- Sanjay Raut | “कीर्तिकरांना लोक उद्यापासून…”, कीर्तीकरांच्या पक्षांतरावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- Job Alert | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘या’ पदांच्या 787 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Gajanan Kirtikar | “…म्हणून मी शिंदे गटात प्रवेश केला”, गजानन कीर्तीकर यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- NCP | “केतकी चितळेला डोक्याचा काही भाग नाही, तशा महिलेवर…”, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं खळबळजनक विधान