ये बात ! ‘पुष्पम प्रिया चौधरी’ जिया हो बिहार की बेटी

ये बात ! ' पुष्पम प्रिया चौधरी ' जिया हो बिहार की बेटी

मुंबई : बिहार मैं बच्चा पैदा होते ही ‘ पॉलिटिक्स ‘ मैं आ जाता हैं ! हे लालू प्रसाद यांचं वाक्य.बिहार मधल्या राजकीय – सामाजिक परिस्थितीला तंतोतंत लागू पडतं.कारण देशभरात जर सगळ्यात जास्त ‘ राजकीय प्रयोग ‘ जर कुठल्या राज्यात होत असतील तर ते बिहार मध्ये. याचं कारण सगळ्यात मोठं कारण म्हणजे या राज्यात तरुणांना लवकरच येणारी राजकीय समज.

येत्या काही दिवसात ( २९ नोव्हेंबरला ) बिहार विधानसभा निवडणूक होणार आहे.त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी बऱ्याच अर्थाने संबंध जोडता येऊ शकतो.कारण देवेंद्र फडणवीस यांना बिहार भाजप प्रभारी बनवले त्या दिवसापासून राज्यातील प्रत्येक राजकीय घटना मग ते कंगना राणावत प्रकरण असो किंवा सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण असो या सगळ्याचा थेट संबंध बिहार विधानसभा निवडणुकीशी जोडला जातोय.

पण बिहार राज्यात येणारं हे इलेक्शन सगळ्याच राजकीय पक्षांना वाटते तेवढे सोपे राहिलेले नाहीये. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे या राजकारणात एका नव्या महिला खेळाडूची झालेली राजकीय एन्ट्री  पुष्पम प्रिया चौधरी  हे त्या मुलीचं नाव.बिहार दरभंगा या ठिकाणी आपले शैक्षणिक करियरला सुरवात करत प्रियाने सिंबायोसिस पुणे – जे.एन.यू.दिल्ली ते थेट
जगविख्यात लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स या विद्यापीठातून ‘ लोक प्रशासन ‘ या विषयांचा अभ्यास करत. पुन्हा एकदा बिहार ‘ विकसित ‘ करण्यासाठी प्रिया परत आली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियाने ‘ प्लुरल पार्टी ‘ नावाच्या पक्षाची घोषणा देखील केली आहे.आणि या पक्षाची मोठी कँपैन टीम सुद्धा उभारली आहे.’ लव बिहार, हेट पॉलिटिक्स ‘ हे तिच्या पक्षाचे ब्रीद वाक्य आहे.प्रिया गेल्या अनेक दिवसांपासून बिहार मधल्या ग्रामीण इलाख्यात आपल्या पक्षाची ताकत वाढवणे कामी दौरे देखील करते आहे.

प्रियाची आई ही महिलांच्या प्रश्नाची अभ्यासक आहे.तर वडील प्राध्यापक आहेत.तिचे आजोबा देखील राजकारणात सक्रिय होते.वडील जनता दल युनायटेड या पक्षाच्या तिकाटावर विधान परिषद सदस्य देखील होते.प्रियाच्या आजोबांनी नितीश कुमार राजकारणात नवीन असताना त्यांना ‘ होप ऑफ बिहार ‘ असं म्हटलं होतं.आणि छोडेंगे ना हम तेरा साथ हो साथी मरते दम तक  या काहीश्या फिल्मी स्टाईल मध्ये नितीश कुमारांना कायम मदत देण्याची तयारी देखील दाखवली होती.पण नितीश यांनी या सगळ्या आशा – आकांक्षेवर पाणी फिरवलं आणि बिहार पुन्हा एकदा मागास राहिल्याची खंत त्या व्यक्त करतात.या सगळ्यातून आपल्याला बिहार राज्याला बाहेर काढायचे म्हणूनच मी राजकारणात येते आहे असे पुष्पम प्रियाचे म्हणणे आहे.बिहार मधल्या अनेक लोकांनी पुष्पम प्रियाला  जिया हो बिहार की बेटी म्हणत दाद देखील दिली आहे.येत्या काही दिवसात पुष्पम प्रियाचे राजकीय कौशल्य आपल्याला दिसेल यात शंका नाही.

महत्वाच्या बातम्या :