पुढील महिन्यात होणार ‘हा’ टी-२० सामना; या मराठी खेळाडूला मिळाली शाहरुख खानच्या संघात संधी!

cricket

मुंबई: गेले ३ महिने जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या महामरीचा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला असून हळूहळू हि क्षेत्रे सावरत असताना दिसत आहेत. कोरोना संकटाच्या काळात ११७ दिवसानंतर अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेला इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेने अंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. मात्र, क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असलेल्या आयपीएल या भारतीय टी-२० स्पर्धेचे आयोजन यंदा करण्यात आले नव्हते.

त्यामुळे, सर्वांना टी-२० क्रिकेटचा थरार अनुभवायचा आहे आणि यासंदर्भातील एक मोठी बातमी समोर येत आहे. १८ ऑगस्ट पासून या टी-२० लीगला सुरुवात होणार असून भारताचा फिरकीपटू प्रविण तांबे बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या संघाकडून खेळण्यास सज्ज झाला आहे. १८ ऑगस्टपासून कॅरेबियन प्रीमिअर लीगला सुरुवात होणार असून २० सप्टेंबरला या लीगचा अंतिम सामना होणार आहे.

संपूर्ण स्पर्धा त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे होणार आहे. या लीगला स्थानिक प्रशासन आणि सरकारने मान्यता डोलू आहे. ‘ सर्व संघांना आणि अधिकाऱ्यांना एकाच हॉटेल मध्ये ठेवण्यात येणार आहे. तर प्रत्येकाला पहिले दोन आठवडे विलग्नवासाच्या(quarantine) नियमांचे पालन करावे लागणार आहे. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक खेळाडूची प्रवासापूर्वी आणि येथे दाखल झाल्यानंतर कोरोना चाचणी करण्यात येणार आहे,’ असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

जोतीरादित्य सिंधीयांनी प्लाज्मा दान करून आपल्या परोपकारी वृत्तीचे दर्शन घडवले – प्रितम मुंडे

मात्र, या लीगमध्ये स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार नाही. या लीगमध्ये रशीद खान, क्रिस लिन, सोहेल तन्वीर, मोहमद नबी, मार्क्स स्टॉयनिस, रॉस टेलर आणि कार्लोस ब्रेथवेट या स्टार खेळाडूंचा समावेश देखील असणार आहे. भारताचा प्रविण तांबे या लीगमध्ये खेणार असून त्याने त्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शाहरुख खानच्या त्रिनिदाद नाइट रायडर्स या संघाकडून तो खेळणार आहे. गतवर्षी दुबईतील एका लीगमध्ये खेळल्यामुळे त्याला इंडियन प्रीमिअर लीगमधील संघ कोलकाता नाइट रायडर्सने निलंबित केले होते.

पक्ष, राजकारण यापलिकडे जाऊन मनसेच्या ढाण्या वाघाने घेतली इंदोरीकर महाराजांची भेट