‘या’ स्टार गोलंदाजाचा क्रिकेटमधून बाहेर जाण्याचा निर्णय ; क्रिकेट विश्वात उडाली खळबळ

क्रिकेट

इंग्लंड : संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आता आगामी जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान होणार आहे. या सामन्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. स्टार गोलंदाजाने क्रिकेटमधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने क्रिकेटमधून ब्रेक घेण्याच्या निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याला सस्पेंड करण्यात आल्यानंतर ऑलीने क्रिकेटपासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयानं सर्वांनाच धक्का बसला आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) एक वादग्रस्त ट्विटच्या संदर्भात वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले होते.  ऑली रॉबिन्सनने 7 ते 8 वर्षांपूर्वी विवादीत ट्विट व्हायरल झाले होते. ज्यावेळी ऑली रॉबिन्सनला इंग्लंड विरुद्ध सीरिजसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली तेव्हा या ट्वीटवरून सगळीकडे गोंधळ उडाला होता. त्यामुळे इंग्लंड बोर्डाने निलंबनाची कारवाई केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP