लोकसभेची ‘ही’ जागा भाजपसाठी ठरते लकी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा वेळी भाजपकडून पुन्हा आम्हीच सत्ता करणार असल्याचा दावा केला जात आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी मोदी सरकारला धुळीत मिळवण्यासाठी चांगलीच मोर्चे बांधणी केली आहे. राजकारणाच्या इतिहात डोकावले असता आपल्याला काही योगायोग पाहिला मिळतात असाच एक योगायोग भाजपच्या बाबतीत देखील घडला आहे. भाजपने लोकसभेच्या त्या जागेवर निवडणूक जिंकली की भाजपला सत्तेवर येण्याला कोणीही रोखू शकले नाही.

राजकीय इतिहासात पाहिले असता गाझीपूरमधील जागा ही भाजप साठी लकी ठरली आहे. त्या जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आला की भाजप केंद्रात आपली सत्ता स्थापन करतो. १९७३च्या निवडणुकीच्या प्रचारात दीनदयाळ यांनी गाझीपूरमध्ये सांगितले होते की, जर भाजपने ही जागा जिंकली तर त्यांचे सरकार दिल्लीत येईल. दीनदयाळ यांच्या वक्तव्या प्रमाणे १९९६ ला गाझीपुर मध्ये भाजपचा विजय झाला आणि केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले.

मात्र १९९६ चे हे सरकार अल्पावधीतचं पडले त्यानंतर १९९९ ला गाझीपुर मधून पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार मनोज सिन्हा हे निवडून आले. त्यावेळी देखील वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भाजपने केंद्रात सत्ता स्थापन केली. त्यांनतर २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा गाझीपूरमधून पराभव झाला आणि भाजपला सत्तेपासुन दूर राहावे लागले. पण २०१४ च्या मोदी लाटेत गाझीपूरमध्ये मनोज सिन्हा यांनी दणदणीत विजय मिळवला आणि केंद्रात भाजप स्पष्ट बहुमतात सत्तेत आले.

त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून गाझीपुर मध्ये विजयासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. पुन्हा एकदा जर विजय मिळवला तर केंद्रात सत्ता भाजपची असणार असा पुरावा खुद्द इतिहासच देत आहे. त्यामुळे गाझीपुर लोकसभा मतदार संघ हा भाजपसाठी लकी असल्याच ठरत आहे.