यामुळे पोलार्ड विरुद्ध क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ ठेवले होते, चेन्नईच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा

दिल्ली : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या लढतीत मुंबईने ४ गडी राखुन सीएसकेचा पराभव केला. सीएसकेने दिलेल्या २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीपणे करत ४ गडी राखुन मात केली. वादळी अर्धशतकासाठी मुंबईच्या कायरान पोलार्डला सामनावीराच्या पुरस्कारनाने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यातील आखेरच्या चेंडुवर मुंबईला विजयासाठी २ धावांची गरज होती. मात्र चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने यावेळी क्षेत्ररक्षक हे सीमारेषेजवळ ठेवल्याने पोलार्डला दोन धावा घेणे सोपे झाले. यानंतर चेन्नईच्या क्षेत्ररक्षणावर सगळीकडुन टिकेची झोड उठली. या रणनीतीचा खुलासा चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी केला आहे. यावेळी ते म्हणाले,’ क्षेत्ररक्षणाची रचना बघून मी अजिबात आश्चर्यचकित झालो नाही. कारण पोलार्ड शानदार फॉर्ममध्ये होता व त्यामुळे तो काय करेल याचा अंदाज व्यक्त करणे शक्य नव्हते.’ असे म्हणाले.

फ्लेमिंग पुढे बोलताना म्हणाला, ‘आमचा अंदाज होता की २०१९ मधील सामन्याप्रमाणे शेवटच्या चेंडूवर खेळाडू धावबाद होईल.’ या सामन्यात चेन्नईने २१९ धावांचा डोंगर उभा केला. मात्र कायरन पोलार्डच्या वादळी खेळीने मुंबईने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. पोलार्डला ८७ धावांची खेळी व गोलंदाजीत मिळवलेल्या २ बळींबद्दल सामनावीराचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

महत्वाच्या बातम्या