हे राजकारण राज्यासाठी घातक : अजित पवार

rane-pawar ajit

पुणे- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळमधील कामशेतमध्ये झालेल्या सभेत खासदार नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. राणे यांनी आजपर्यंत विविध पक्षांमधून केलेल्या राजकीय प्रवासाच्या मुद्द्यावरून पवार यांनी टीका केली आहे. अश्या पद्धतीचे राजकारण हे घातक असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं.

काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान नारायण राणे यांच्या संदर्भात जो प्रश्न विचारण्यात आला होता त्या प्रश्नाचा धागा पकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणे आणि सेना – भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. सेनेसोबत भाजपने युती केल्यास मी तुम्हाला सोडून जाईन असं राणे भाजपला सांगत आहेत.खासदारकी दिली तरी सुद्धा सोडून जाऊ असं ते म्हणत आहेत. नारायण राणे यांनी आजपर्यंत शिवसेना,कॉंग्रेस,भाजपा,स्वाभिमान पक्ष असा प्रवास केला तो त्यांचा अधिकार आहे मात्र हे जे राजकारण आहे ते राज्यासाठी घातक असल्याची टीका पवार यांनी केली.