Share

IND vs NZ | न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सामन्यांमध्ये विराटची जागा घेणार ‘हा’ खेळाडू

टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये तीन सामन्याच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना माउंट माउंगानुईक या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मालिकेमध्ये टीम इंडियाचा मुख्य फलंदाज विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये या मालिकेमध्ये विराट कोहली (Virat Kohli) च्या जागी भारतीय संघातील एक खेळाडू दिसणार आहे.

IND vs NZ सामन्यात विराटची जागा घेणार ‘हा’ खेळाडू

IND vs NZ या टी 20 मालिकेमध्ये विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) फलंदाजी करताना दिसणार आहे. टी 20 मालिकेमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. तर दुसरीकडे श्रेयस अय्यरने ही या क्रमांकावर अनेक मॅचेस खेळल्या आहेत. आणि त्यामध्ये त्याने उत्तम कामगिरी दाखवली आहे. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या टी 20 विश्वचषक 2022 स्पर्धेमध्ये श्रेयस भारतीय संघाचा भाग नव्हता.

श्रेयस अय्यरने टीम इंडियासाठी आत्तापर्यंत एकूण 47 टी 20 सामने खेळलेले आहे. श्रेयसने या सामन्यांमध्ये 32.19 च्या सरासरीने 130 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने टी 20 मध्ये 136.06 च्या स्ट्राईक रेटने धावा करत आत्तापर्यंत 7 अर्धशतकी खेळी खेळल्या आहेत. त्याचबरोबर श्रेयस अय्यरने 33 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1299 धावा केल्या आहेत. तर 5 कसोटी सामन्यात 422 धावा केले आहेत.

टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये सुरू झालेल्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेमध्ये आपली छाप पाडण्यासाठी उत्सुकता होता. मात्र पावसाने भारतीय संघाच्या या उत्सुकतेवर पाणी फिरले आहे. या सामन्यांमध्ये भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध आहे. पण पावसामुळे पहिला सामना रद्द झाल्याने खेळाडू निराश झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये तीन सामन्याच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना माउंट माउंगानुईक या …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now