‘या’ खेळाडूला KKR संघातून करारमुक्त करायला हवे होते’ गंभीरने व्यक्त केलं स्पष्ट मत !

गौतम गंभीर

नवी दिल्ली : नुकतेच आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे बिगुल वाजले आहेत. बुधवारी (२० जानेवारी) सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आयपीएल २०२१ च्या हंगामाच्या लिलावाआधी संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आता IPL 2021 लिलावाच्या आधी संघाने काही खेळाडूंना संघात कायम राखले आहे. त्यापैकी एका खेळाडूबद्दल माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने आक्षेप नोंदवला आहे.

यामध्ये ‘कोलकाताच्या संघाने येत्या हंगामासाठी फिरकीपटू कुलदीप यादवला संघात कायम ठेवण्याचा निर्णय खूपच अनाकलनीय आहे. कुलदीपला संघात असताना फारशी संधी दिली गेली नाही. अशा परिस्थितीत त्याला संघातून करारमुक्त करायला हवं होतं. त्यामुळे कदाचित दुसऱ्या संघात तरी त्याला खेळायची आणि स्वत:ला सिद्ध करायची संधी मिळाली असती. जर तुम्ही भारतीय संघातून खेळत असाल पण तुम्हाला तुमच्या फ्रँचाईसीकडून खेळायची संधी मिळत नसेल तर हे तुमच्या कारकिर्दीसाठी खूपच मारक असते’, असं मत गंभीरने व्यक्त केले.

“कुलदीपला कोलकाताने संघात कायम राखले आहे. अशा वेळी त्यांनी कुलदीपला खेळायची संधी द्यायला हवी. आणि तसं होत नसेल तर स्वत: कुलदीपने पुढाकार घेऊन संघ व्यवस्थापनाला विनंती करावी की मला संघातून करारमुक्त करा आणि दुसऱ्या संघातून खेळू द्या. कारण जर कुलदीप यादव लिलावासाठी आला असता तर त्याच्या नक्कीच महागडी बोली लागली असती”, असा विश्वासदेखील गंभीरने व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या