Share

Most Sixes in 2022 | आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियातील ‘या’ खेळाडूने लगावले आहेत सर्वाधिक षटकार

Most Sixes in 2022 | टीम महाराष्ट्र देशा: या वर्षामध्ये क्रिकेटचे अनेक धमाकेदार सामने झाले आहेत. तर, या सामन्यांमध्ये भारतीय संघ काही खास कामगिरी करू शकला नाही. कारण भारताला दोन मोठ्या स्पर्धांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ आशिया चषकात सुपर फोर फेरीतून बाहेर पडला होता. तर, टी-20 विश्वचषक स्पर्धेतून भारताला उपांत्य फेरीमधून बाहेर पडावे लागले. अशा परिस्थितीत पराभव स्वीकारूनही भारतीय संघाला एक स्टार फलंदाज मिळाला आहे. हा फलंदाज सध्या आयसीसी (ICC) फलंदाजी यादीमध्ये नंबर-1 क्रमांकावर आहे. तो फलंदाज म्हणजे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav).

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सूर्याने लगावले सर्वाधिक षटकार (Most Sixes in 2022) 

सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक षटकार (Most Sixes in 2022) मारणारा फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमार यादवने क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये 74 षटकार मारले आहेत. 2022 या वर्षांमध्ये सूर्यकुमारने इंग्लंडच्या जॉस बटलर आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरला मागे सोडले आहे. या वर्षभरात बटलर ने 39 षटकार मारले आहे. तर, मिलरने 31 षटकार ठोकले आहेत. सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये तब्बल 44 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्याने 40.68 च्या सरासरीने आणि 157.87 च्या 1424 धावा केले आहेत. तर यादरम्यान त्याने 76 षटकार मारले आहेत.

सूर्यकुमार यादवनंतर या यादीमध्ये निकलोस पुरणचे नाव आहे. निकलोस पुरणने यावर्षी तिन्ही फॉरमॅटमध्ये 69 षटकार लगावले आहेत. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर 58 षटकासह यूएईचा मोहम्मद वसीम याचे नाव आहे. 55 षटकासह या यादीमध्ये झिंबाब्वेचा सिकंदर रजा असून, त्या क्रमांकावर 45 षटकासह रोहित शर्माचे नाव आहे.

तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड शिखर धवनच्या नावावर आहे. शिखर धवनने 21 सामन्यांमध्ये 865 धावा करत 7 षटकार ठेकले आहेत. त्याचबरोबर t-20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवने सर्वाधिक षटकार लगावले आहेत. सूर्याने टी-20 मध्ये तब्बल 68 षटकार मारले आहेत. या वर्षात कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड इंग्लंड संघातील बेन स्टोक्सच्या नावावर आहे. यामध्ये स्टोक्सने 14 सामन्यांमध्ये 24 षटकार ठोकले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

Most Sixes in 2022 | टीम महाराष्ट्र देशा: या वर्षामध्ये क्रिकेटचे अनेक धमाकेदार सामने झाले आहेत. तर, या सामन्यांमध्ये भारतीय …

पुढे वाचा

Cricket Sports