Share

KL Rahul | 2023 विश्वचषकामध्ये केएल राहुलच्या ऐवजी ‘हा’ खेळाडू असू शकतो सलामीवीर, ब्रेट ली म्हणाला…

KL Rahul | टीम महाराष्ट्र देशा: पुढच्या वर्षी भारतामध्ये मर्यादित षटकांचा एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये हे सामने पार पडतील. भारतीय संघातील संभाव्य खेळाडूंबाबत माजी खेळाडू आणि तज्ञ आपली मतं मांडत आहे. भारतीय संघाचे सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि केएल राहुल (KL Rahul) गेल्या काही सामन्यांपासून खराब फॉर्मला झुंज देत आहे. त्यामुळे विश्वचषकामध्ये या दोघांच्या स्थानाबाबत चर्चा सुरू आहे. भारतीय संघामध्ये राहुल आणि धवनचा विचार करायला हवा, असे ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली याने म्हटले आहे.

विश्वचषकामध्ये भारतीय संघासाठी सर्वोत्तम सलामीवीर कोण असू शकतो यावर ब्रेक लीने आपले मत मांडले आहे. विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा खेळणार आहे. पण रोहित शर्मा सोबत कोण सलामी देणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. युवा फलंदाज इशान किशन रोहित शर्माला चांगली साथ देऊ शकतो असा विश्वास ब्रेस लीने दिला आहे. कारण बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये इशान किशन ऐतिहासिक द्विशतक ठोकले होते. त्यानंतर अनेकांकडून त्याची प्रशंसा झाली होती. या खेळीनंतर इशान किशनने अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते.

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी इशानला पाठिंबा दिला आहे. ब्रेड लीने त्याच्या यूट्यूब चैनल वर सांगितले आहे की,”घरच्या मैदानावर होणाऱ्या एक दिवसीय विश्वचषकात भारतीय संघासाठी ईशान किशन सलामी देऊ शकतो. त्याने एक दिवसीय इतिहासात सर्वात जलद दोनशे धावा केले आहेत. त्यामुळे भविष्यात देखील तो अशी कामगिरी करू शकतो.”

बांगलादेशविरुद्धच्या झालेल्या या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा युवा सलामीवीर इशान किशनने अनेक इतिहास रचले आहेत. इशान किशनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. इशान किशनच्या आधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग आणि रोहित शर्मा यांनी द्विशतक केले होते. मात्र, या युवा फलंदाजाने फक्त 126 चेंडूमध्ये द्विशतक झळकावले होते.

महत्वाच्या बातम्या

KL Rahul | टीम महाराष्ट्र देशा: पुढच्या वर्षी भारतामध्ये मर्यादित षटकांचा एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये हे सामने …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now