fbpx

ना शिंदे, ना चव्हाण महाराष्ट्रातला ‘हा’ नेता होणार कॉंग्रेसचा अध्यक्ष

congress-flag

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. या पराभवानंतरच्या चिंतन बैठकीत पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर या पदावर अद्याप कोणाचीही निवड झालेली नाही. तरीही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी वारंवार केली आहे.

पक्षाध्यक्ष पदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. यात महाराष्ट्रातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांची नवे आघाडीवर होती. परंतु आता या नावांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील नेते मुकुल वासनिक यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता जास्त आहे.

आज दिल्लीत कॉंग्रेस कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला कॉंग्रेसचे जेष्ठ नेते उपस्थित असणार आहेत. या बैठकीत अध्यक्ष पदाविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच मुकुल वासनिक यांनी शुक्रवारी अहमद पटेल, ए.के.अँटनी आणि के.सी.वेणुगोपाल यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर युवा नेत्यांना संधी देण्यात यावी अशी मागणी होत आहे. त्यात राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि मध्यप्रदेशचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचे नाव आघाडीवर होते. परंतु त्यांच्या नावांच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागातून अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

 

कोल्हापूरचा धोका टळला, मात्र सांगलीत अजूनही हायअलर्ट

 

सांगलीत जगभरातून मदत येतेय, पण परमपूज्य भिडे गुरुजी कुठे आहेत? – आव्हाड