‘या’ राज्यात भाजपच्या मित्रपक्षाने सोडली साथ, भाजपला मोठा दणका 

lingayat-pontiffs-support-siddaramaiah-biggest-setback-for-bjp

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुक आता जवळजवळ पार पडली आहे, केवळ निकाल जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे आता साऱ्या देशाचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे आणि देशाचा भावी पंतप्रधान कोण होणार याकडे लागले आहे. असे असतानाच मणिपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. नागा पीपल्स फ्रंट या पक्षाने भाजपची साथ सोडली आहे. त्यामुळे मणिपुरमधील भाजपचं सरकार धोक्यात आलं आहे.

एनपीएफ पक्षाचे प्रवक्ते अचुम्बेमो कीकॉन यांनी सरकारचा पाठिंबा काढत असल्याची माहिती माध्यमांना दिली. कोहिमा येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात बैठक घेण्यात आली. खूप वेळ चाललेल्या या बैठकीत सरकारचा पाठिंबा काढत असल्याचा निर्णय घेतला. एनपीएफ पक्षाच्या सूचना तसेच कल्पनांचा भाजप विचार करत नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कीकॉन यांनी सांगितले.

Loading...

मणिपूर विधानसभेत एकूण ६० सदस्य आहेत. काँग्रेसने २८ जागा जिंकल्या मात्र त्यातील आठ आमदारांनी भाजपसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे भाजपचे एकूण संख्याबळ २१ वरुन २९ झाले. त्यानंतर भाजपने नागा पीपल्स फ्रंट यांच्यासह इतर तीन आमदारांचा पाठिंबा घेत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर आज नागा पीपल्स फ्रंटने आपल्या चार आमदारांचा पाठिंबा काढला आहे. तर नॅशनल पिपल्स पार्टीचे चार आमदार आहेत. त्यामुळे मणिपूरमधील  भाजप सरकार धोक्यात आले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका