मुंबई : उत्तर प्रदेशमधील भाजपचे कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Morya) यांच्यासह तीन आमदारांनी राजीनामा दिल्याने भाजपला उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला आहे. अशातच आता तिकीट वाटपाबाबत भाजप पक्षश्रेष्ठींच्या दिल्लीत बैठकावर बैठका होत आहेत. उत्तर प्रदेशतील ४५ भाजप आमदारांचा पत्ता कट करण्याची तयारी असल्याचे वृत्त आहे. भाजपकडून आता वेगळी रणनिती आखण्याची तयारी सुरु आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी ट्विट करत टीका केली आहे.
उत्तर प्रदेशातील बहुजन समाजाचे भाजपा आमदार काय करणार याची भविष्यवाणी या पोपटाने कधीच केली होती 😄. pic.twitter.com/V6k584cvUK
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 12, 2022
जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा पोपटासोबतचा व्हायरल झालेला एक व्हिडीओ ट्विट करत म्हणाले, ‘उत्तर प्रदेशातील बहुजन समाजाचे भाजपा आमदार काय करणार याची भविष्यवाणी या पोपटाने कधीच केली होती’, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.
येत्या एकदोन दिवसांत भाजपातील आणखी दोन मंत्री आणि काही आमदार भाजपला रामराम ठोकतील असा दावा केला जात आहे. त्याचवेळी उमेदवार निश्चितीसाठी भाजपची दिल्लीत महत्त्वाची बैठक सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. हे बैठकीचे सत्र संपल्यानंतर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…तर तुमचा मेंदू कुठे आहे तेवढा तपासून पाहा”, पवारांवर केलेल्या टीकेवर आव्हाडांचे प्रत्युत्तर
- रेल्वे सुरक्षा दलात भरतीची ‘ती’ प्रसिद्ध झालेली जाहिरात बोगस?; रेल्वे प्रशासनाने दिली माहिती
- युपीत भाजपला मोठा धक्का; ‘या’ मंत्र्याने केला सपामध्ये प्रवेश
- ‘आता पर्यंत आम्ही तुम्हा खूप…’; न्यायालयाचा परमबीरसिंग यांना दणका
- “पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही”, पडळकरांना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<