पुण्यातील लॉकडाऊनला केला ‘या’ संघटनेने विरोध!

lockdown

पुणे: कोरोनाने देशात शिरकाव केल्यापासून राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे- पिंपरी-चिंचवड या शहरांत कहर केला आहे. शहरांतील वाढती कोरोनाबाधितांचा आकडा हा चिंताजनक असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.  याच पार्श्वभूमीवर १३ ते २३ जुलै दरम्यान कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

मात्र, या लोकडाऊनला व्यापारी महासंघाचा विरोध असून करोनावर लॉक डाउन हे औषध होऊ शकत नाही, अशी भूमिका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी पुणे शहराच्या लॉकडाऊनवर मांडली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, ‘आता पुण्यात लॉकडाउनच्या घोषणेमुळे व्यापारी वर्गाला आणखी संकटांना सामोरे जावे लागणार आहे. आम्ही कसे जगायचे? असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.’

याबरोबरच, ‘हा आजार आणखी वर्षभर तरी राहील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे करोनावर लॉकडाउन हा पर्याय होऊ शकत नाही. अर्थकारणाला गती देण्याच्या दृष्टीने, दुकाने सुरू राहिली पाहिजे’, अशी मागणी देखील त्यांनी केली. जे नागरिक नियमांचे पालन करीत नाहीत, अशा नागरिकांवर कारवाई केली पाहिजे. पण हे होताना दिसत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

बारामती शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – अजित पवार

तसेच शासनाकडून येणार्‍या नियमाचं पालन करून आजही दुकाने सुरू ठेवली आहेत आणि भविष्यात देखील सुरू ठेवू. पण आता जाहीर करण्यात आलेल्या पुन्हा लॉक डाउनला आमचा विरोध असून, या निर्णयाचा आम्ही निषेध व्यक्त करीत असल्याचेही त्यांना सांगितले.

तर, ‘मास्क लावला नाही, शरीररिक अंतर पाळले नाहीतर कडक कारवाई करा, पण 3 टक्के प्रतिबंधीत क्षेत्रातील लोकांसाठी 97 टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून लॉकडाऊन सारखा सोपा निर्णय घेऊ नका,’ अशा शब्दात पुण्याचे खासदार आणि माजी पालकमंत्री भाजप नेते गिरीश बापट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

पक्ष, राजकारण यापलिकडे जाऊन मनसेच्या ढाण्या वाघाने घेतली इंदोरीकर महाराजांची भेट