आता ‘हे’ अधिकारी ‘अल कायदा’च्या हिटलिस्टवर

terrorism 2

नवी दिल्ली – अल कायदा ही दहशतवादी संघटना भारतीय मुस्लिम तरुणांना जिहादसाठी भडकवत असून, आता भारतातील हिंदूंबरोबरच आयएएस, आयपीएस अधिकारी ‘अल कायदा’च्या हिटलिस्टवर असल्याची माहिती समोर आलीये.एका इंग्रजी वृत्तपत्राने या संदर्भातील वृत्त दिले आहे.या वृत्तानुसार  भारतातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपला निशाणा बनवण्याचे आदेश भारतीय उपखंडातील अल कायदाशी संलग्न संघटनांकडून देण्यात आले आहेत. या आदेशाचा एका ऑडिओ टेप देखील व्हायरल करण्यात आला आहे.

या ऑडिओमध्ये उत्तर प्रदेशातील संभाल येथील एक मौलाना असिम उमरबान याने देशातील एनडीए सरकारला मुस्लिमविरोधी म्हटले आहे. तो मुळचा पाकिस्तानी आहे. उमरने आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा डाव आखल्याचे यातील संभाषणातून स्पष्ट होते. दंगलीदरम्यान, या अधिकाऱ्यांकडून मुस्लिमांकडील हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला होता, याचा बदला घेण्यासाठी त्यांना टार्गेट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून, देशातील आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांना अत्यंत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.