fbpx

खासदार उदयनराजेंना लोकसभेला टक्कर देण्यासाठी या नवीन चेहऱ्याची चर्चा

udayan-raje

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून टक्कर देण्यास नवीन चेहरे समोर येत आहेत. भाजप कडून अतुल भोसलेंच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. भाजपने नेहमी भोसलेंना प्रोत्साहन देण्याचे काम केले असून आगामी लोकसभेसाठी भाजपकडून त्यांनाच उमेदवारी देण्याबाबत विचार होऊ शकतो.

खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या मतदारसंघात प्रचंड लोकप्रियता आहे. त्यामुळे भाजपने कोणताही उमदेवार मैदानात उतरविला तरी भाजपला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजधानी महोत्सव आयोजित केला. यामध्ये अनके राजकीय दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. हा महोत्सव आगामी लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी असल्याचे बोलले जात आहे. उदयनराजे भोसले राष्ट्रवादीकडून तिकिट मिळविण्याच्या तयारीत असून राष्ट्रवादीसोबत कॉंग्रेसची युती निश्चित असल्याने दोन्ही कॉंग्रेसला मान्य होणारा उमेदवार दिला तरच राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी होणार आहे.

कोण आहेत अतुल भोसले?

विलासराव देशमुख यांचे बंधू आमदार दिलीप देशमुख यांच्या मुलीशी अतुल भोसले यांचा विवाह झाला आहे. भोसले हे लातूरच्या देशमुख कुटुंबियांचे जावई आहेत. तसेच स्वत: भोसले यांच्या कुटूंबाचा पश्चिम  महाराष्ट्रात मोठा प्रभाव आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेवून अतुल भोसलेंना भाजपकडून ताकद देण्याचे काम सुरु आहे.

atul bhosale