राम शिंदेंची विजयी घोडदौड रोखण्यासाठी राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता मैदानात ?

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांना महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात होणार असली तरी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या १० वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत, तसेच ते मंत्री असल्याने भाजपचे चांगलेच वर्चस्व या मतदारसंघावर असलेलं दिसून येत आहे.

Loading...

कर्जत-जामखेड हा दुष्काळी भाग असल्याने पिण्याचे पाणी व जनावरांचा चारा या दोन प्रमुख समस्या आहेत. यात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यात राम शिंदे यांना यश आले असल्याच मतदारसंघातील जनतेचं म्हणणे आहे. त्यामुळे यावेळीही या मतदारसंघातून राम शिंदे हेच विजयी परंपरा कायम राखतील अशी शक्यता आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या राजेंद्र फाळके यांचा पराभव केला होता. कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे यांना तोड देणारा नेता कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. त्यासाठी रोहित पवार यांनी वारंवार या मतदारसंघाचा दौरा करत कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे कर्जत-जामखेडमधून रोहित पवार यांची उमेदवारी नक्की मानली जात आहे. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अद्यात याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

पालकमंत्री राम शिंदे यांचे काम पाहता त्यांचा पराभव करण्यासाठी रोहित पवार यांच्यासारख्या युवा व दांगडा राजकीय वारसा असलेला नेता मैदानात उतरविणे हे राष्ट्रवादीचे धोरण कितपत यशस्वी होईल हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकानंतर स्पष्ट होणार आहे. राम शिंदे यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पूर्ण ताकद लावणार यात शंका नाही.

दरम्यान, कर्जत-जामखेडची जनता राम शिंदे यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवणार की आयात उमेदवार रोहित पवार यांना निवडून देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. राम शिंदे हे स्थानिक उमेदवार असल्याने स्थानिक प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे त्यामुळे या रंगतदार लढाईत राम शिंदे याचं पारडं जड असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली