‘..यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दु:खी असतात’, नितीन गडकरींचे टीकास्त्र

gadkari-thakre

राजस्थान : भाजपकडून मागील काही महिन्यांमध्ये चार राज्यांमधील मुख्यमंत्री बदलण्यात आले असल्याने गडकरींच्या वक्तव्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. सोमवारी(१३ सप्टें.) केंद्रीय वाहतूक मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी राजस्थानमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी बोलत असतांना गडकरींनी आपल्या पक्षातील नेत्यांसोबतच इतरही नेत्यांवर टीकास्त्रांचा वर्षाव केला. त्यामुळे त्यांनी केलेल्या टोलेबाजीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दरम्यान, ‘आमदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळेच दु:खी आहेत. मुख्यमंत्र्यांना आपण कधीपर्यंत राहू आणि कधी जाऊ याचा भरवसा नसल्याने दु:खी आहेत’ असा टोला देखील यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

पुढे ते म्हणाले की,’समस्या सर्वांसोबत आहे, प्रत्येकजण दु:खी आहे. आमदार मंत्री होऊ शकले नाहीत म्हणून दु:खी आहेत. मंत्री झाले तर चांगलं खात मिळाले नाही म्हणून दु:खी आहेत. ज्या मंत्र्यांना चांगलं खाते मिळाले ते मुख्यमंत्री होऊ शकलो नाही म्हणून दु:खी आहेत. आणि मुख्यमंत्री दु:खी आहेत कारण कधीपर्यंत पदावर राहू हे माहिती नाही,’असेही गडकरी म्हणाले.

दरम्यान, रविवारी(१२ सप्टें.)भाजपाने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांना संधी दिली. केंद्रातील अनेक दावेदार मंत्री होऊ शकले नसून, राज्यातही अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या