fbpx

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी राज्याच्या ‘या’ नेत्याला दिला पक्षश्रेष्ठींनी शब्द ?

bjp-flag-representational-image

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पुन्हा खासदार झाले असून मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाच्या रिक्त पदासाठी भाजपमध्ये राज्यातील नेत्यांची चाचपणी सुरु आहे. तर आता इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. तसेच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सुजितसिंह ठाकूर, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावांची चर्चा आहे. परंतु आमदार हाळवणकर यांना श्रेष्ठींनी शब्द दिल्याची माहिती आहे.

राज्यात आता काही काळातच विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त न ठेवता भाजप लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष निवडणार आहे. या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेके नेते आहेत. मात्र आमदार सुरेश हाळवणकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.