Share

New SUV Jeep Launch | भारतात ‘ही’ Jeep SUV होणार पुढच्या महिन्यात लाँच

टीम महाराष्ट्र देशा: भारत हा तंत्रज्ञानात दिवसेंदिवस विकसित होत असलेला देश आहे. नवनवीन तंत्रज्ञान भारत स्वीकारत आहे. त्याचबरोबर अनेक ऑटोमोबाईल कंपनी देखील आपली नवनवीन वाहने भारतात लाँच करत आहे. सुपर स्पोर्टी आणि जबरदस्त वाहनांपैकी एक सुप्रसिद्ध SUV Jeep पुढच्या महिन्यात भारतात लाँच होणार आहे. 2022 Grand Cherokee आपली नवीन SUV जीप भारतीय बाजारामध्ये लाँच करणार आहे. ही SUV फक्त भारतामध्येच असेंबल केली जाणार आहे. या नवीन SUV च्या लूक, फीचर्स, डिझाईन इंजिन आणि किमती बद्दल जाणून घेऊया.

फीचर्स

2022 Grand Cherokee Jeep SUV चे इंटिरियर Grand Cherokee L या गाडीप्रमाणेच ठेवण्यात आलेले आहे. या SUV मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह 10.1inch सेंट्रल इन्फोटेनमेंट सिस्टीम उपलब्ध आहे. या SUV च्या सीटिंग लेआउट बद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये सीटिंग लेआउट दोन-रो केबिन, मॅकिंटॉश ऑडिओ सिस्टम, लेदर अपहोल्स्ट्री आणि तीन-स्पोक मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हीलसह पाच सीट आहेत. त्याचबरोबर या SUV मध्ये SUV ला प्लग-इन-हायब्रिड पॉवरट्रेन देखील मिळते. जे दोन इलेक्ट्रिक मोटर्ससह 2.0 L टर्बो-पेट्रोल इंजिनला जोडलेले आहे.

इंजिन

2022 Grand Cherokee Jeep SUV च्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 3.6L V6 इंजिन उपलब्ध आहे. जे 293hp मॅक्झिमम पावर आणि 352.5Nm पीक टार्क जनरेट करते. त्याचबरोबर या SUV दुसरे मॉडेल 5.7L V8 इंजिन सुसज्ज असून, 357hp मॅक्झिमम पॉवर आणि 528.7Nm टार्क जनरेट करतो. या SUV मध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक (AMT) गिअरबॉक्स ट्रान्समिशनचा वापर करण्यात आला आहे.

किंमत

UA माध्ये 2022 Grand Cherokee Jeep SUV सुरुवातीची किंमत $ 35,000 म्हणजे भारतीय 26 लाख रुपये एवढी आहे. तर भारतामध्ये या गाडीची किंमत क्वचित वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: भारत हा तंत्रज्ञानात दिवसेंदिवस विकसित होत असलेला देश आहे. नवनवीन तंत्रज्ञान भारत स्वीकारत आहे. त्याचबरोबर अनेक ऑटोमोबाईल …

पुढे वाचा

Cars And Bike

Join WhatsApp

Join Now