…हा मराठा समाजाच्या एकीचा विजय: खा. संभाजीराजे छत्रपती

sambhajiraje

कोल्हापूर : काल ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. अनेक दिवस मदत न मिळाल्याने आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या फडणवीस सरकारच्या काळातील मान्य केलेल्या मागण्यांची आता लवकरच पूर्तता करण्यात येईल. त्यामुळे, मराठा आरक्षणात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबाला १० लाख रुपये आणि सरकारी नोकऱ्या देण्यासंदर्भात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या बैठकीत पुन्हा चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे.

तर, या निर्णयाचे स्वागत मराठा मोर्चा समन्वयकांसह खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील केले आहे. अखेर मराठा समाजाची मागणी मान्य झाली असून हा समाजाच्या एकीचा विजय आहे, असे देखील फेसबुक व ट्विटर द्वारे पोस्टकरत आपली प्रतिक्रिया दिली. संभाजीराजे म्हणतात, ‘अखेर मराठा समाजाची मागणी मान्य झाली! मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता ज्या समाज बांधवांनी बलिदान दिले त्यांच्या घरातील सदस्यांकरिता सरकारने नोकरी दिली पाहिजे ही मागणी समाज अनेक महिन्यांपासून करत होता.’

दिलासादायक: राज्यात काल नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा जास्त

दरम्यान, ‘ती आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाली असे सांगण्यात येते. तसेच सरकारच्या वतीने कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा आज मंत्री मंडळाच्या बैढकीत करण्यात आली.याबद्दल मराठा समाजाच्या वतीने  समाजाचा घटक म्हणून महाराष्ट्र शासनाचे आभार. हा  मराठा समाजाच्या एकीचा विजय आहे.’, अशा शब्दात त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

मराठा आंदोलन: अखेर न्याय मिळाला, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी आणि १० लाख रुपये

तसेच, बैठकीनंतर शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली कि, लवकरच या निर्णयाची अंमलबाजवणी करण्यात येईल. दरम्यान, एसटी महामंडळात नोकरी देण्यात येणार असल्याचे समजत आहे. या निर्णयाचं मराठा आरक्षणासाठीचे वकिल विनोद पाटील यांनी स्वागत केलं आहे. या निर्णयाबद्दल अजितदादा पवार, एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळाचे आभार मानत असल्याचं विनोद पाटील म्हणाले.

वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन करणार; भाजपचा ईशारा